नगर ग्रामपंचायत Live : संगमनेर तालुक्यात थोरात गटाचं पारडं जड ; २७ ग्रामपंचायतीवर वर्चस्व | पुढारी

नगर ग्रामपंचायत Live : संगमनेर तालुक्यात थोरात गटाचं पारडं जड ; २७ ग्रामपंचायतीवर वर्चस्व

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचाय तीच्या निवडणुकीत जनतेतून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाचे २५ तर याच गटाचे २ सरपंच अगदोरच बिनविरोध निवडून आले आहे. तर महसूलमंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाचे १० सरपंच निवडून आले आहेत, तर माजी महसूलमंत्री आ बाळासाहेब थोरात यांच्या ताब्यात असणारी तळेगाव निमोण घुलेवाडी कोल्हेवाडी चार ग्रामपंचायतीचे सर पंच हे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचे निवडून आले आहे तसेच माजी महसूलमंत्री आ बाळासाहेब थोरात यांचे गाव असलेल्या जोर्वे गावचा सरपंच हा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाचा झाला आहे त्यामुळे हा माजी मंत्री थोरात यांना विखे गटाने दिलेला मोठा धक्का आहे.

संगमनेर नगरपालिकेच्या क्रीडा संकुल नामधील बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळी दहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणीसाठी 20 टेबल लावण्यात आले होते. 37 ग्रामपंचायतसाठी ९ फेऱ्या करण्यात आल्या एकामागेएक फेरीचा निकाल हाती येत होता. निकाल हाती येताच विविध गावच्या ग्रामपंचायतचे निवडून आलेले उमेदवार आणि कार्यकर्ते एकमेकांवरती मुक्त गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करत होते.

संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायती पैकी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाच्या ताब्यात साकुर, धांदरफळ बुद्रुक, निमगाव जाळी, निमगाव, भोजापूर, धांदरफळ खुर्द ,चिंचोली गुरव रणखांब वाडी ,खराडी ,वाघापूर, जांभुळवाडी दरे वाडी, कर्जुले पठार, जांबुत बुद्रुक अंभोरे करुले ,ओझर खुर्द ,उंबरी बाळापुर हंगे वाडी ,सायखिंडी, डोळसणे पिंपरणे कोळ वाडे, वडझरी बुद्रुक ,वडझरी खुर्द पोखरी हवेली वाघापूर या 26 ग्रामपंचायतीवर आमदार थोरात गटाचे सरपंच पदाचे उमेदवार जनतेमधून विजयी झाली आहे. तर विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचे तळेगाव निमोण कोल्हेवाडी मालुंजे जोर्वे निंबाळे रहिमपूर कनकापूर सादतपू या ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत.

घुलेवाडी ग्रामपंचायत च्या निवडणुकीत माजी सरपंच सोपान राऊत वबाळासाहेब राऊत यांच्या गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार निर्मला कैलास राऊत या विजयी झालेल्या आहेत तर निळवंडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या सासुबाई शशिकला पवार या सुद्धाविजयी झालेल्या आहेत मात्र त्यांनी व यांच्या समर्थकांनी विखे गटाला पाठिंबा दिला असल्याचे माध्यमांसमोर बोलताना जाहीर केले

Back to top button