परभणी: पेठ शिवणी येथे किराणा दुकानासह घराला आग; १५ लाखांचे नुकसान

परभणी: पेठ शिवणी येथे किराणा दुकानासह घराला आग; १५ लाखांचे नुकसान

पेठ शिवणी: पुढारी वृत्तसेवा: पालम तालुक्यातील पेठ शिवणी येथील विनायक गुरव यांच्या केदार किराणा दुकानासह धनंजय करंजे यांच्या घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज (दि.२७) पहाटे तीनच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, पेठ शिवणी (ता. पालम) येथील विनायक गुरव यांचे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेच्या समोर असलेल्या केदार किराणा दुकानात विद्युत वायरला शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यामध्ये किराणा दुकानातील सामानासह गोदामातील साठवलेला शेतमाल जळाला. यामध्ये सुमारे १२ लाखांचे नुकसान झाले. तर धनंजय करंजे यांच्या घरातील शेतमाल व संसारोपयोगी साहित्य जळून ३ लाखांचे नुकसान झाले.

या घटनेची माहिती पालम पोलिसांना देण्यात आली. आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या शर्तीचे प्रयत्न केले. गंगाखेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला होता.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news