Hingoli News : तंबाखू, गुटखा सेवन करणाऱ्या 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई

जिल्हा परिषद कार्यालयात उडाली खळबळ, तपासणी मोहीम होणार सुरू
government office tobacco ban action
तंबाखू, गुटखा सेवन करणाऱ्या 13 कर्मचाऱ्यांवर कारवाईpudhari photo
Published on
Updated on

हिंगोली : येथील जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयांमधून कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतर 13 जणांकडे गुटखा व तंबाखूच्या पुड्या आढळून आल्या आहेत. तर हे कर्मचारी कार्यालयात काम करीत असताना गुटखाचे सेवन करीत असताना आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात गुटखाबंदी असतानाही अनेक ठिकाणी गुटखा विक्री होत असल्याने पोलिस विभागाने पानटपऱ्यांची तपासणी करून कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे चोरून लपून गुटखा विक्री करणाऱ्या पानटपरी चालकांचे धाबे दणाणले आहेत.

government office tobacco ban action
Ashok Kharat Case| "नोकरी गेली तरी चालेल, पण सत्य बाहेर आणणारच!" खरात प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांचा 'सिंघम' अवतार

दररोज तीन ते चार ठिकाणी छापे टाकून गुटखा जप्त होत आहे. दरम्यान, गुटखा खाऊन शासकीय कार्यालयाचे कोपरे रंगत असल्याचे चित्र दिसू लागले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे यांच्या पुढाकारातून शासकीय कार्यालयातून तपासणी केली जात आहे.

government office tobacco ban action
Parbhani Crime | मानवत तालुक्यात साडेसात लाखांचा गुटख्यासह ५ लाखांचे वाहन जप्त

त्यानुसार जिल्हा सल्लागार डॉ. किरण लोंढे, कुलदीप केळकर, आनंद साळवे यांच्या पथकाने जिल्हा परिषद कार्यालयात तपासणी करण्यात आली. यावेळी पथकाने जिल्हा परिषद अंतर्गत विविध कार्यालयातून कर्मचाऱ्यांची तपासणी केली. यामध्ये 13 कर्मचारी गुटखा व तंबाखू खात असल्याचे आढळून आले. तसेच त्यांच्याकडे गुटखा व तंबाखूच्या पुड्यादेखील आढळून आल्या. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

  • जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालयामधूनही लवकरच तपासणी मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news