MLA Santosh Bangar : म्हातारे मंत्री नको, आमच्यासारख्या वाघांना संधी द्या

आ. बांगर यांची श्रीकांत शिंदेंपुढे मागणी, आगामी निवडणुकीचे मांडले गणित
MLA Santosh Bangar
MLA Santosh Bangar : म्हातारे मंत्री नको, आमच्यासारख्या वाघांना संधी द्या file photo
Published on
Updated on

We don't want elderly ministers; give an opportunity to 'tigers' like us

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा सत्ताधारी महायुतीचा घटकपक्ष असणाऱ्या शिवसेनेत आता सत्तेवरून अंतर्गत धुसपूस सुरू झाली आहे. हिंगोली येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर थेट पक्ष नेतृत्त्वालाच आव्हान देत म्हणाले की, म्हाताऱ्या मंत्र्यांना घरी पाठवा आणि आमच्यासारख्या वाघांना संधी द्या! सत्तेत असूनही पदांपासून दूर असलेल्या नव्या पिढीतील नेत्यांची घुसमट बांगर यांच्या या एका वाक्यात उफाळून आली आहे.

MLA Santosh Bangar
निष्ठावंतांना डावलल्याने शिवसेनेत असंतोषाचा स्फोट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची गुरूवारी हिंगोलीत सभा झाली. या सभेत बोलताना आमदार संतोष बांगर यांनी उपरोक्त विधान केले. ते म्हणाले, सद्यस्थितीत अनेक मंत्री घोड्यावरून शेळ्या हाकत आहेत. ते फोन केला तर रिप्लायही देत नाहीत. हे मंत्री पक्षाला कमजोर करण्याचे काम करत आहेत. काहीजण नुसतेच लोकांमध्ये जातात, पण कोणतेही काम करत नाहीत. मंत्री प्रकाश आबिटकर यांना कधीही फोन केला, तर ते उचलतात. समस्या जाणून घेतात. पण अनेक मंत्री म्हातारे झालेत.

त्यांना ऐकू येत नाही. या मंत्र्यांना पदावरून बाजूला करा. या शेळ्यांमागे वाघ दडले आहेत. त्यांना पुढे करा. असे झाले तरच २०२९ मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असे ते म्हणाले. संतोष बांगर यांनी यावेळी कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नाही. पण त्यांच्या टीकेचा रोख पाहता शिवसेनेतील हे म्हातारे मंत्री कोण? यावर राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाली आहे.

MLA Santosh Bangar
जालना हॉटस्पॉट : नेत्यांची फिल्डिंग जोरात

नीट पेपरफुटीप्रकरणी जे काही घडले ते अत्यंत चुकीचे आहे. नीट परीक्षेतील प्रकार अत्यंत चुकीचा आहे. दोषींवर कारवाई होईल. तसेच पुढील परीक्षा पारदर्शक पद्धतीने होईल व अशा प्रकारांची पुन्हा पुनरावृत्ती होणार नाही. यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. भविष्यात ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यावर व प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर विचार सुरू आहे अशी प्रतिक्रिया खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news