निष्ठावंतांना डावलल्याने शिवसेनेत असंतोषाचा स्फोट

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिंदे गटासमोर मोठे आव्हान
Vaijapur shinde shivsena
निष्ठावंतांना डावलल्याने शिवसेनेत असंतोषाचा स्फोटFile Photo
Published on
Updated on

The sidelining of loyal workers and leaders has led to an explosion of discontent in the Shiv Sena

नितीन थोरात वैजापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात अंतर्गत नार-ाजीचा सूर अधिक तीव्र होताना दिसत आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठवंत कार्यकर्त्यांना उमेदवारी व पदवाटपात डावलण्यात आल्याचा आरोप होत असून, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उघड असंतोष निर्माण झाला आहे.

Vaijapur shinde shivsena
मनपा एमजेपीला देणार आणखी ८९ कोटी

मैदानात प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी काही ठराविक चेहऱ्यांनाच संधी दिल्याने तळागाळातील शिवसैनिक नाराज झाले आहेत. हृङ्गपक्षासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला, मात्र निवडणुकीच्या वेळी आमच्याकडे दुर्लक्ष झाले, फ्फ अशी भावना अनेक निष्ठवंतांनी व्यक्त केली आहे. या नाराजीचा थेट परिणाम प्रचार यंत्रणेवर आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यावर होण्याची शक्यता आहेत.

तर आमदार रमेश बोरनारे यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या भावाला उभा केले होते मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे घराणेशाहीच्या राजकारणाला वैजापूरमध्ये थारा न दिल्याचे स्पष्ट झाले तसेच आता सध्याला शिव सेनेमध्ये निष्ठवतांना डावल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक शिंदेच्या शिवसेनेसाठी मोठी कसोटी ठरणार आहे. नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करून त्यांना पुन्हा पक्षप्रवाहात आणणे, हे नेतृत्वापुढचे मोठे आव्हान बनले आहे. अन्यथा ही अंतर्गत नाराजी विरोधकांसाठी संधी ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Vaijapur shinde shivsena
Fake notes : बँकेच्या सीडीएममध्ये १२ हजारांच्या बनावट नोटा

निष्ठावान शिवसैनिकांमध्ये संताप

भाऊसाहेब चिकटगावकरांची संपूर्ण राजकीय कारकीर्द ही शिवसे नेच्या विरोधात गेलेली आहे. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी माघार घेत आमदार रमेश बोरनारे यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता.

आता बोरसर गटातून त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आल्याने स्थानिक पातळीवर निष्ठावान शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची भावना व्यक्त होत असून, या निर्णयाविरोधात संतापाची लाट उसळताना दिसत आहे. या उमेदवारीमुळे शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली असून, येत्या काळात या नाराजीचे पडसाद पक्षाला कितपत झेलावे लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजपकडून आमदार बोरनारे यांची कोंडी करण्याचा डाव ?

स्थानिक राजकारणात घडामोडींना वेग आला असून, भाजपकडून आमदार रमेश बोरनारे यांचा पराभव करण्यासाठी विविध पातळ्यांवर हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. अनेक नेत्यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश करून आपल्या गोटात ओढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, बोरनारे यांचा पराभव करण्यासाठी भाजपातील काही नेते ठाकरेंच्या शिवसेनेतील उमेदवाराला पडद्याआड पाठिंबा देत असल्याचे चित्र सध्या चर्चेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news