जालना हॉटस्पॉट : नेत्यांची फिल्डिंग जोरात

दिग्गजांच्या सभांनी गाजवले मैदान, सत्तास्थापनेसाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Jalna News
जालना हॉटस्पॉट : नेत्यांची फिल्डिंग जोरातFile Photo
Published on
Updated on

Jalna hotspot: Leaders are actively campaigning

संघपाल वाहूळकर

जालना : जसजसी मतदानाची तारीख जवळ येत आहे. तसतसचे राजकीय वातावरण गरम होत आहे. प्रभागातील प्रत्येक घराघरांपर्यंत, मतदारांच्या दारांपर्यंत प्रचार रॅली, कॉर्नर बैठकांतून नेत्यांसह उमेदवार, कार्यकर्ते जात आहे. जालना महापालिकेवर आपलीच सत्ता स्थापन व्हावी, यासाठी सर्वच पक्षातील बड्या नेत्यांची कस्सून फिल्डिंग लावली आहे. आपले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

Jalna News
Jalna news: खारुळ तळ्यात बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला

दरम्यान, जालना महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. राज्यात महायुती असली तरी स्थानिक पातळीवर महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपा, शिव सेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने एकमत न झाल्याने स्वतंत्र निवडणुक लढवण्याचा निर्णय केला आहे. त्यानुसार भाजपाने ६३ जागेवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर शिंदेसेना आणि राष्ट्रवादीने देखील अनुक्रमे ५६ आणि ४० जागावर आपले उमेदवार उभे केले आहे.

खरी लढत ही महायुतीतील मित्र पक्ष भाजपा विरुध्द शिंदे सेनेत होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने एकमत करुन प्रत्येक प्रभागात आपले उमेदवार उभे केले आहेत. यामुळे महाविकास आघाडी देखील तगडी फाईट देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीन आणि एमआयएमने देखील १७ उमेदवार रिंगणात उभे केले आहे. यामुळे या उमेवादारामुळे पक्षाच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढवू शकते.मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून रणनिती आखल्या जात आहे. सत्ता स्थापनेचे गणित जुळविण्यात येत आहे.

Jalna News
Muncipal Election :शेवटचा टप्पा; निवडणुकीच्या आखाड्यात मात्तबरांची उडी

बड्या नेत्यांच्या सभा, सत्ता स्थापनेचा दावा

भाजपाकडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभा झाल्या आहेत. यामुळे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मरगळ दूर झाली. शिंदेसेनेकडून आमदार अर्जुन खोतकर पायाला भिंगरी बांधून फिरत आहे. शिंदे सेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची सभा झाल्याने शिंदे सेनेतही नवचैतन्य निर्माण झाले आहे. शिवाय, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची सभा पार पडल्याने निवडणूकीत आमचेही तगडे आव्हान आहे, असे दाखवून दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news