Hingoli Bribe Case : १० हजारांची लाच घेताना दोन भुकरमापक चतुर्भुज

मोजणीची सीट देण्यासाठी स्वीकारली लाच
Hingoli Bribe Case
Hingoli Bribe Case : १० हजारांची लाच घेताना दोन भुकरमापक चतुर्भुजfile photo
Published on
Updated on

Two Land Surveyors Arrested While Accepting a Bribe of ₹10,000

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बासंबा येथील शेतकऱ्याला शेतीमोजणीची सीट देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेतांना उपाधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील दोन भुकरमापकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी रंगेहात पकडले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Hingoli Bribe Case
Parbhani Bribe Case : पाथरीत खळबळ, ८ हजारांची लाच घेताना 'भूमी अभिलेख'चा कर्मचारी रंगेहात जेरबंद

बासंबा येथील एका शेतकऱ्याने त्याच्या शेत जमीनीची मोजणी करून घेतली होती. त्यानुसार उपाधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील भुकर मापकांनी जमीनीची मोजणी केली. त्यानंतर शेतकऱ्याने मोजणी सीट मागितली असता त्यांना १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली.

मात्र त्यानंतर तडजोडीनुसार १० हजार रुपये लाच देण्याचे ठरले होते. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने हिंगोलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने पंचा समक्ष पडताळणी केली असता मोजणीच्या वेळी ४ हजार रुपये घेतल्याचे दोघांनी मान्य केले होते.

Hingoli Bribe Case
Hingoli Bribe | लाख येथे २८ हजारांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

आता १० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यावरून शुक्रवारी लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक सुलभा राऊत, पोलिस उपनिरीक्षक विजय शुक्ला, जमादार भगवान मंडलिक, राजाराम फुफाटे, विनोद पुंडगे, शेख युनूस, शेख अकबर, शिवाजी वाघ, अमोल जाधव यांच्या पथकाने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला होता. ठरल्या प्रमाणे संबंधित शेतकऱ्याकडून भुकरमापक उमेश राऊत याने लाच मागितली अन अविनाश गोरे याने लाचेची रक्कम घेतली. त्यांनी लाचेची रक्कम घेताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news