

औंढा नागनाथ : औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी आदिवासी आश्रम शाळेच्या वस्तीगृहात दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने बुधवारी दिनांक 25 रोजी दुपारी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे जिल्ह्याभरात खळबळ उडाली होती व सदर विद्यार्थीनींने ऐवढे टोकाचे पाऊल का उचलले या बद्दल तर्कवीतर्क लावले जात होते .
मात्र दिनांक 27 - 6 - 2025 रोजी मुलीचे वडील सुखदेव नामदेव घाटे यांनी नागनाथ पोलीस स्टेशनला येऊन अशी तक्रार दिली.की मयत स्वाती सखाराम झाडे इयत्ता नववी मध्ये इंग्रजी पेपर मध्ये नापास झाल्याने व इयत्ता दहावी मध्ये दोन विषयात नापास झाल्यास तिला शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिकता येणार नाही. या तणावातून आत्महत्या केल्याची फिर्याद औंढा नागनाथ पोलीस स्टेशनला दिली. सदर प्रकरणाचा पुढील तपास औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जी एस राहिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोलीस उपनिरीक्षक शेख खुदुस हे करीत आहे.