Hingoli News: वसतीगृहाच्या खोलीत जाऊन येते असं सांगून निघाली... परतलीच नाही; 16 वर्षांच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

तिने टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
Mental Health News
Mental Health NewsPudhari
Published on
Updated on

Pipaldari Student Death Case:

औंढा नागनाथ, पुढारी वृतसेवा :

पिंपळदरी आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने बुधवारी (दि. २५) दुपारी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. तिने टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Mental Health News
JEE Top Rankers 2025 | हिंगोलीचा रितेश पडोळे चमकला: JEE-25 परीक्षेत भारतात चौथा

औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी येथील स्वाती सुखदेव झाटे (१६) ही विद्यार्थिनी पिंपळदरी येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेते. या शाळेतच तिचा भाऊही पाचवी वर्गात शिक्षण घेतो. मंगळवारी स्वातीला तिच्या वडिलांनी शाळेत आणून सोडले होते. त्यानंतर बुधवारी सकाळीही तिचे वडील तिला भेटण्यासाठी आले होते.

दोघेही सुमारे पंधरा ते वीस मिनिटे बोलले. दरम्यान, दुपारी भोजनाच्या वेळी स्वाती तिच्या मैत्रिणीसह भोजनासाठी खोलीमधून खाली आली होती. त्यानंतर अचानक तिने खोलीत जाऊन येते, असे कारण सांगत मैत्रिणींना सोडून खोलीमधे गेली. त्यानंतर तिने ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

Mental Health News
Hingoli Crime News | हॉटेलमध्ये थरार : दोघांवर खंजीराने हल्ला, १ ठार, एक जण गंभीर जखमी

यावेळी मोठा आवाज झाल्याने तेथील विद्यार्थिनी व वसतिगृहाच्या अधीक्षिका घटनास्थळी धावल्या. त्यांनी खोलीत पाहिले असता स्वाती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. या सर्वांनी तिला खाली उतरवून तातडीने उपचारासाठी पिंपळदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

त्या ठिकाणी तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी सुनील बारसे, मुख्याध्यापक अवचार यांच्यासह शिक्षक तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. स्वातीच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी व एक भाऊ आहे.

पिंपळदरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर स्वातीचे ऑक्सिजन लेव्हल कमी होत होते. त्यामुळे तिला तातडीने ऑक्सिजनची सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेची गरज होती. त्यानुसार १०८ क्रमांकाला कळविण्यात आले होते. मात्र एक तासानंतरही रुग्णवाहिका आलीच नाही. त्यामुळे पिंपळदरीच्या आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेनेच तिला उपचारासाठी आणावे लागले. त्यात ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने स्वातीला जीव गमवावा लागल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news