Aundha Nagnath Tractor Fire | महसूल पथकाच्या भीतीने पळून जाताना ट्रॅक्टर हेड उलटून जळाला; मालकाचा महसूल प्रशासनावर गंभीर आरोप

Hingoli News | औंढा नागनाथ तालुक्यातील अनखली पोटा शिवारातील घटना
Aundha Nagnath Ankhali Tractor Fire
ट्रॅक्टरची हेड उलटून आग लागून जागीच जळून खाक झाला(Pudhari Photo)
Published on
Updated on

Aundha Nagnath Ankhali Tractor Fire

औंढा नागनाथ : तालुक्यातील अनखली पोटा शिवारात नदीच्या बाजूला उभे केलेले ट्रॅक्टर तहसीलदारांच्या पथकास पाहताच मंगळवारी (दि. 28) सकाळी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना ट्रॅक्टरची हेड उलटून आग लागून जागीच जळून खाक झाले. या प्रकाराबद्दल शेतकरी आणि तहसील प्रशासनात चांगलीच जुंपल्याच दिसून येत आहे.

एकीकडे ट्रॅक्टर पेटून दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर दुसरीकडे औंढयाचे तहसीलदार हरीश गाडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तालुक्यातील अनखळी पोटा शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करीत असल्याचे दिसून आल्यामुळे ट्रॅक्टर पळून जाण्याच्या तयारीत असताना हेड उलटून जळाल्याचे सांगितले.

Aundha Nagnath Ankhali Tractor Fire
Aundha Nagnath Accident | औंढा नागनाथ - जिंतूर मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक; २ ठार, दोन जण गंभीर जखमी

वाळू घाटाकडे तहसील प्रशासनाने विशेष लक्ष दिले असल्याने या ठिकाणी नियमितपणे पाहणी केली जात होती. आज सकाळी पोटाशिवारातून वाळू घाटावर काही ट्रॅक्टर असल्याची माहिती तहसीलच्या पथकाला मिळाली. यावरून तहसीलदार हरीश गाडे, मंडळ अधिकारी काळे, तलाठी गजानन सोनटक्के, नितीन आंबोरे, कापसे, तलाठी मुखिर यांचे पथक पोटाशिवारात तहसीलदार यांच्या खाजगी गाडीने दाखल झाले. पथक आल्याचे लक्षात येताच तेथे वाळू भरत असलेले ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टरसह पळ काढला.

बाजूच्या शेतात उभे केलेले ट्रॅक्टर तलाठी हजारे व मुखिर यांनी पेटून दिल्याचा आरोप ट्रॅक्टर मालक नवनाथ डोंबे यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी याबाबत माहिती दिल्यानंतर डोंबे यांच्यासह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण ट्रॅक्टर जळून खाक झाला होता. वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई न करता आपले ट्रॅक्टर विनाकारण पेटवून दिल्याचा आरोप डोंबे यांनी केला.

Aundha Nagnath Ankhali Tractor Fire
Aundha Nagnath Death| औंढा नागनाथ नागेशवाडी शिवारातील विहिरीत मृतदेह आढळला

घटनास्थळी महसूलचे पथक आल्याचा पुरावा म्हणून त्यांनी तहसीलदार हरीश गाडे यांच्या कारचे छायाचित्र देखील काढले आहे . या संदर्भात तहसीलदार हरीश गाडे यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आज मौजे अनखळी पोटा नदी परिसरात ट्रॅक्टर हेड किनी यंत्रासह आढळून आले. त्यांनी महसूल पथकास पाहतात पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ट्रॅक्टरचे हेड उलटले आणि त्याला अचानक आग लागली. पोलीस प्रशासने घटनास्थळी स्थळ पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे गाडे सांगितले .

वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत असल्याचे स्पष्ट केले. नवनाथ डोंबे यांनी ट्रॅक्टर जाळल्यामुळे मला आत्महत्या शिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. मामाच्या शेतात उभे केलेले ट्रॅक्टर तलाठी हजारे व मुखेड यांनी नेण्याचा प्रयत्न केला. त्यांना शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर नेऊ दिले नसल्याने ट्रॅक्टरच्या बॅटरीचे मायनस व प्लस एकच करून शॉर्ट सर्किट करून पेटवून दिले. संपूर्ण भरपाई नाही मिळाली, तर आत्महत्या शिवाय पर्याय नसल्याचे डोंबे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news