

Aundha Nagnath dead body found in well
औंढा नागनाथ: तालुक्यातील नागेशवाडी शिवारात विहिरीत पाण्यावर तरंगताना एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आज (दि.२४) दुपारी साडेबाराच्या दरम्यान आढळून आला. याची माहिती औंढा नागनाथ पोलिसांना मिळताच तत्काळ सहायक पोलीस निरीक्षक कैलास भगत, जमादार इम्रानुद्दीन सिद्दिकी, दिलीप नाईक, राम गडदे याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
विहिरीवर सापडलेल्या आधार कार्ड वरून मृताची ओळख पटली आहे. नारायण रंगनाथ कावळे (वय ३५, रा. नागापू , ता. वसमत, जि. हिंगोली) असे मृताचे नाव आहे. मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी औंढा नागनाथ रुग्णालयात नेण्यात आला आहे. ही घटना खून की आत्महत्या आहे. याबाबत संभ्रमावस्था असून घटनेचा पुढील तपास औंढा नागनाथ पोलिसांकडून करण्यात येत आहे.