

Pradnya Satav BJP:दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाबाबत अखेर त्यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास होत आहे. या विकासात आम्हाला देखील साथ द्यायची आहे. असे सांगत प्रज्ञा सातव यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं.
यानंतर प्रज्ञा सातव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, 'माझे पती सर्वांचे लाडके खासदार राजीव सातव यांनी हिंगोलीसाठी मोठं काम केलं. २०२१ मध्ये मी विधान परिषदेची आमदार झाले. माझ्या कार्यकर्त्यांमुळे मी आजा थंबीरपणे उभी राहिले.'
सातव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, 'देवा भाऊंच्या नेतृत्वाखाली राज्याचा जो विकास होत आहे त्यामध्ये आम्हाला देखील साथ द्यायची आहे. आमच्या गावाकडे या तारीख द्या आपण कार्यक्रम घेऊन मोठा पक्षप्रवेश (कार्यकर्त्यांचा) करून घेऊ.'
दरम्यान, आज प्रज्ञा सातव आणि दिलीप माने यांचा भाजप प्रवेश झाला आहे. मात्र माजी आमदार दिलीप माने यांना भाजपात घेण्यात सुभाष देशमुख यांचा विरोध होता. अखेर देशमुख यांचा विरोध मावळत आज भाजपात माने प्रवेश केला आहे. दिलीप माने यांची सोलापूर महापालिका क्षेत्रात मोठी ताकद आहे.
त्याच जोडीला जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील होणार असल्याने या दोन्ही पक्षप्रवेशामुळं भाजपला मोठं बळ मिळणार आहे.