

Poorna Sugar Factory honored by Finance Ministry
वसमत, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा इन्कम टॅक्स, जीएसटी टॅक्स व इतर करांचे नियमित भरणा केल्यामुळे भारत सरकारतर्फे कारखान्याचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
पूर्णा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वसमतनगर यांच्याकडून शासनाच्या निर्धारित वेळेत २०२४ ते २०२५ या काळातील जीएसटी रिटर्न व शासकीय देय कराचे नियमित कर भरल्यामुळे केंद्रीय जीएसटी बोर्ड व वित्त मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून कारखान्याचा सन्मान करण्यात आला.
कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापनाने आर्थिक स्थितीत केलेल्या कामाबद्दल प्रशस्तीपत्र देऊन ही बाब कारखान्याच्या हिताची असून यामध्ये कारखान्यावरील सर्व कामगार, संचालक मंडळ अधिकारी तसेच कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील कदम, ऊस विकास समितीचे अध्यक्ष शहाजीराव देसाई, कार्यकारी संचालक के. पी. आकुसकर यांनी अभिनंदन केले.