Hingoli News : दुचाकी अपघातात एक जण ठार

रमजान ईदनिमित्त नातेवाईकांना भेटण्यासाठी जाताना बोल्डा फाटा येथे घडली घटना
One killed in two-wheeler accident
दुचाकी अपघातात एक जण ठारFile Photo
Published on
Updated on

One killed in two-wheeler accident

कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा :

हिंगोली येथून रमजान ईदनिमित्त नातेवाईकांना बोल्डाफाटा येथे दुचाकी वाहनावर भेटण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीचा अपघात होऊन एक जण ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. कळमनुरी पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

One killed in two-wheeler accident
Beed Crime : प्रदीप फाटेला अटक; तीन दिवसांची पोलिस कोठडी

हिंगोली शहरातील पेन्शनपुरा भागातील रहिवासी असलेले शेख जावेद शेख मुसा (४०) हे शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या दुचाकी वाहनावर हिंगोली येथून बोल्डाफाटा येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. हिंगोली ते कळमनुरी मार्गावर उमराफाटा शिवारात त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.

यामध्ये ते रस्त्यावरच पडले. या अपघाताची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे, जमादार शिवाजी देवगुंडे, रवी इंगोले, लक्ष्मीकांत माखणे, गजानन होळकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

One killed in two-wheeler accident
Beed Bike Theft : दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या

पोलिसांनी शेख जावेद यांना तातडीने कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. दरम्यान, सदर अपघाताच्या ठिकाणी शेख जावेद यांची दुचाकी पडलेली दिसून आली. मात्र हा अपघात नेमका कसा झाला हे कळू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत शेख जावेद यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news