Beed Crime : प्रदीप फाटेला अटक; तीन दिवसांची पोलिस कोठडी

बीड : चाळीस दिवसांपासून होता फरार; पुण्यातून उचलले
Beed Crime News
प्रदीप फाटेला अटक; तीन दिवसांची पोलिस कोठडीpudhari photo
Published on
Updated on

बीड ः जीएसटी विभागातील अधिकारी प्रदीप फाटे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फु लगाव येथून मंगळवारी सायंकाळी अटक केली. त्याला बुधवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सचिन जाधवर यांच्या आत्महत्या प्रकरणात प्रदीप फ ाटे याच्या विरोधात बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

बीड येथील जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांनी दि.17 जानेवारी रोजी कपिलधारकडे जाणाऱ्या रस्त्यावर गाडी पार्क करत जीवन संपवले होते. या प्रकरणात त्यांच्याजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रदीप फाटे याच्या जाचाला कंटाळून जीवन संपवल्याचे नमूद करण्यात आले होते.

Beed Crime News
Jalna News : बाटलीबंद संस्कृतीने शहरातील पाणपोई हरवल्या

बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून फाटे हा फ रार होता. महिना उलटूनही फाटे अटक न झाल्याने सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी कुटूंबीयांसह उपोषण केले होते.

Beed Crime News
Congress internal dispute Jalna : स्वीकृत नगरसेवक पदावरून काँग्रेसमध्ये वाद पेटला

यानंतर पोलिसांनी तातडीने सुत्रे हलवत आठ दिवसात फाटे याच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह ग्रामीण पोलिस ठाण्याचे सपोनि बाळराजे दराडे यांनी पुणे परिसरात गेल्या तीन दिवसाांसून शोध सुरु केला होता.

यात फुलगाव येथे लपून बसलेला फाटे याला पकडण्यात या पथकाला यश आले. त्याला बुधवारी बीड येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

फाटे याची नार्कोटेस्ट करण्याची मागणी

सचिन जाधवर यांच्या जीवन संपवण्याप्रकरणातील आरोपी प्रदीप फ ाटे याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या तीन दिवसांतील तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु जीएसटी विभागातील अशी कोणती प्रकरणे होती, ज्यामुळे फ ाटे हा जाधवर यांना त्रास देत होता, त्या प्रकरणात काय गुढ दडलेले आहे, अशा सर्व बाजुंनी ही चौकशी करावी, त्याबरोबरच फ ाटे याची नार्कोटेस्ट करावी अशी मागणी मयुरी जाधवर यांनी केली आहे.

आंदोलनाची वेळ का यावी?

प्रदीप फ ाटे याच्याविरोधात जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल झाला होता, तेव्हापासून तो फ रार होता. विशेष म्हणजे त्याचा जामीन अर्ज देखील बीडच्या न्यायालयाने फे टाळला होता. यानंतरही त्याला अटक होत नसल्याने सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांना आपल्या मुलाबाळांसह पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसावे लागले. यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिस प्रशासनाने आठ दिवसांत अटक करण्याचे आश्वासन दिले होते.

आश्वासनानंतर आठ दिवस सोमवार ,9 मार्च रोजी संपताच मंगळवारी फ ाटे याला अटक केली. पोलिसांनी ठरवले तर कोणताच आरोपी फार काळ फ रार राहू शकत नाही, हेच यातून समोर आले. पोलिसांनी ही कारवाई यापूर्वीच करणे अपेक्षित होते, परंतु जाधवर कुटुंबीयांवर उपोषणाची वेळच का दिली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नवीन सिम घेतले; ग्रामीण भागात लपला

प्रदीप फाटे याने पोलिस त्याच्यापर्यंत पोहचणार नाहीत, यासाठी पुरेपूर काळजी घेतली होती. वाघोलीतील एका नातेवाईकाच्या मदतीने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात म्हणजेच फु लगाव येथे एका घरात ठाण मांडले होते. संपर्कासाठी त्याने नवीन सिमकार्ड आणि मोबाईल घेतला होता. पुण्यातील नातेवाईकाबाबत तपास पथकाला माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्या नातेवाईकाच्या मदतीने फु लगाव येथे दाखल होत फ ाटे याच्या मुसक्या आवळल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news