Hingoli Crime News : ४ क्विंटल अफूच्या साठ्यासह एकाला बेड्या

मूर्तिजापूर शिवारात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; अर्धा एकर शेतातील ७ लाखांची अफूची झाडे जप्त
Hingoli Crime News
Hingoli Crime News : ४ क्विंटल अफूच्या साठ्यासह एकाला बेड्याfile photo
Published on
Updated on

One arrested with 4 quintals of opium stockpile

औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा :

वसमत तालुक्यातील मूर्तिजापूर सावंगी शिवारात औंढा नागनाथ पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका शेतातून तब्बल अर्धा एकर जमिनीवर लावण्यात आलेले अफूची झाडे गुरुवारी (दि.१९) जप्त केली. सुमारे ४ क्विटल अफूची किंमत ७ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Hingoli Crime News
Wasmat Vegetable market : वसमतमध्ये अत्याधुनिक भाजीपाला मार्केट उभारणार ; जुने गोदाम हटवून सुविधांयुक्त यंत्रणा उभी करणार

हिंगोली जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांनी गुन्हे शाखा व १३ ठाणेदारांची पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून अवैध वाळू वाहतूक, मटका, जुगार अड्डे यांची माहिती घेऊन छापे टाकले जात आहेत. याशिवाय शस्त्र बाळगणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी मागील चार दिवसांपासून गांजा व अफूची शेती करणाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वसमत तालुक्यातील सिरळी शिवारातून १ क्विटल ७७ किलो अफू जप्त केला होता. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तपास सुरू आहे.

Hingoli Crime News
Maha ShivRatri | लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागेश्वर नागनाथ मंदिरामध्ये रथोत्सव साजरा!

मूर्तिजापूर सावंगी शिवारात गुलाब राठोड याच्या शेतात अफूची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, औंढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक दत्ता कानगुले, अमोल इंगोले यांच्यासह ४० जणांच्या पथकाने गुरुवारी सकाळीच शेताची माहिती घेण्यास सुरवात केली.

पहाटे सहा ते नऊ असे तीन तास शोध मोहिमेनंतर पोलिसांना गव्हाच्या पिकात अफूची लागवड केलेली दिसून आली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक निलाभ रोहन यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, पोलिसांनी अफूची झाडे उपटून त्याचे मोजमाप केले असता अफूच्या झाडांचे वजन ४ क्विटल भरले असून, त्याची किंमत सुमारे ७ लाख रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी गुलाब जाधव यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news