Wasmat Vegetable market : वसमतमध्ये अत्याधुनिक भाजीपाला मार्केट उभारणार ; जुने गोदाम हटवून सुविधांयुक्त यंत्रणा उभी करणार

नगर पालिकेचा निर्णय, अनेक निर्णयावर उमटली मोहर
Wasmat Vegetable market
kolhapur : पावसाचा तडाखा...भाजीपाला महागाईचा भडकाPudhari File Photo
Published on
Updated on

खदीर अहेमद

वसमत : नगर परिषदेच्या हद्दीतील जुने शासकीय गोदाम हटवून त्या जागेवर अत्याधुनिक सुविधांनी युक्त भाजीपाला मार्केट उभारण्याचा ठराव एकमताने बुधवारी मंजूर करण्यात आला. पालिकेच्या सभागृहात बुधवारी नगराध्यक्षा सुनिता मनमोहन बाहेती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले.

सभेत शहराच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. नगरपरिषद हद्दीतील जुने शासकीय गोदाम हटवून त्या जागेवर अत्याधुनिक सुविधांनी युक्त भाजीपाला मार्केट उभारण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी व व्यापाऱ्यांना आधुनिक बाजारपेठ उपलब्ध होणार असून शहराच्या अर्थचक्रालाही चालना मिळणार आहे.

Wasmat Vegetable market
Child sexual abuse case : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ऊर्जा बचतीच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या मालकीच्या सतीपांग्रा, दगडगाव रस्ता व सिद्धेश्वर पंपिंग स्टेशन येथे सोलार प्लांट उभारण्यासही हिरवा कंदील देण्यात आला. यामुळे वीज खर्चात बचत होऊन पर्यावरणपूरक उपक्रमाला चालना मिळेल, असे सदस्यांनी नमूद केले.

घनकचरा व्यवस्थापनासाठी वार्षिक निविदा प्रक्रिया राबविणे तसेच डंपिंग ग्राउंडवरील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी बायोमायनिंग पद्धती अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वच्छ व हरित शहर उभारण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी अॅनिमल बर्थ कंट्रोल सेंटर व केनेल स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.

Wasmat Vegetable market
Sand mining monitoring : वाळू घाटांची तहसीलदारांकडून पाहणी
  • नागरिकांची सुरक्षा आणि प्राणीसंवर्धन यामध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. सभेत सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत शहराच्या विकासासाठी एकजुटीची भूमिका घेतली. या निर्णयांमुळे वसमत शहराच्या प्रगतीला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news