Ramrao Wadkute Funeral | खासदार रामराव वडकुते अनंतात विलीन; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

हिंगोलीत अंत्ययात्रेला जनसागर; दिग्गज नेत्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
Ramrao Wadkute Last Rites
Ramrao Wadkute Last RitesPudhari
Published on: 
Updated on: 

Ramrao Wadkute Last Rites

हिंगोली : भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता हिंगोली शहरालगतच्या महाकाली नगर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

खासदार रामराव वडकुते यांच्यावर दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रविवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे भाजपसह महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच हिंगोलीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती.

Ramrao Wadkute Last Rites
Ramrao Wadkute Tribute |  "रामराव वडकुते यांच्या निधनाने महाराष्ट्राचे नुकसान"; राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह शरद पवार यांच्याकडून श्रद्धांजली

सोमवारी त्यांचे पार्थिव छत्रपती संभाजीनगरमार्गे परभणी येथे आणण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पार्थिव हिंगोलीत पोहोचले. यावेळी अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास शहरातील एनटीसी परिसरातून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. 'खासदार रामराव वडकुते अमर रहे' अशा घोषणा देत निघालेली अंत्ययात्रा महाकाली नगर येथे पोहोचली. त्यानंतर शासकीय आणि सामाजिक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार गजानन घुगे, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजेश नवघरे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ramrao Wadkute Last Rites
Hingoli News : सोने स्वस्त होऊनही खरेदीकडे पाठ

वडकुते कुटुंबीयांच्या राजकीय पुनर्वसनाची मागणी

खासदार रामराव वडकुते यांनी महाराष्ट्रासह राज्याबाहेरही भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. विशेषतः धनगर समाजाला भाजपच्या विचारप्रवाहाशी जोडण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या अकाली निधनामुळे भाजपने एक निष्ठावंत आणि प्रभावी नेतृत्व गमावले असून, धनगर समाजाचीही मोठी राजकीय हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपने वडकुते कुटुंबीयांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करावे, अशी मागणी समाजबांधव आणि समर्थकांकडून पुढे येत आहे. खासदार वडकुते यांच्या पत्नी इंदुबाई वडकुते किंवा त्यांचे पुत्र शशिकांत वडकुते यांना पक्षाने राजकीय संधी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Ramrao Wadkute Last Rites
Hingoli News : पुरस्कार वितरण सोहळ्यात हिंगोलीचा डंका

मुख्यमंत्री, पक्ष योग्य निर्णय घेतील : बावनकुळे

दरम्यान, वडकुते कुटुंबीयांच्या राजकीय पुनर्वसनाच्या मागणीबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत निश्चितच योग्य निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.