मनोज जरांगेंचे मराठवाडा-विदर्भ सीमेवर भव्य स्वागत

आरक्षण जनजागृती रॅलीला हिंगोलीतून प्रारंभ
Manoj Jarange Patil Reservation Awareness Rally
कनेरगाव नाका येथे जरांगे-पाटील यांचे सकल मराठा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. file photo

कनेरगाव नाका : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीला आज पासून हिंगोली येथून प्रारंभ झाला. मराठवाडा-विदर्भ सीमेवर असलेल्या हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे जरांगे-पाटील यांचे सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.

Manoj Jarange Patil Reservation Awareness Rally
मराठा आरक्षणाचे मारेकरी हेच लोक : मनोज जरांगे

यावेळी कनेरगाव नाका, मोप, पिंपरी वायचाळ, कानडखेडा खुर्द, कलबुर्गा, वांझोळा, परिसरातील हजारोंचा जनसमुदाय मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी जमला होता. राज्य महामार्गावर असलेले आंबाळा पाटीवर जरांगेंच्या स्वागतासाठी भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूने जेसीबीतून फुलांची उधळण करत जरांगे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अंबाळा, बोंडाळा, बोडखी, आंबाळा तांडा व आडगाव, भिंगी, बेलोरा, चिंचाळा या परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेथून जरांगे हिंगोली येथील संवाद व जनजागृती रॅलीसाठी रवाना झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news