Hingoli Crime News : जटाशंकर मंदिर फोडून चोरी; रोख रकमेसह चांदीच्या वस्तूंवर डल्ला

श्वान व ठसे तज्ञ पथकाची तपासणी सुरू
Hingoli Crime News
Hingoli Crime News : जटाशंकर मंदिर फोडून चोरी; रोख रकमेसह चांदीच्या वस्तूंवर डल्लाcrime news
Published on
Updated on

Jatashankar Temple Burglarized; Cash and Silver Articles Stolen

आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा :

कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील सुप्रसिद्ध श्री जटाशंकर देवस्थान मंदिरात शुक्रवारी (दि. 24 एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम व भाविकांनी अर्पण केलेल्या चांदीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. विशेष म्हणजे, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिव्हायझरही चोरून नेले.

Hingoli Crime News
Theft | केज तालुक्यात पुन्हा घरफोडी; शिर्डीला गेलेल्या कुटुंबाच्या घरात लाखोंची चोरी

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री एक ते चार या दरम्यान चोरट्यांनी मंदिराच्या मागील बाजूने प्रवेश केला. आत घुसल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही यंत्रणा निकामी केली आणि त्यानंतर दानपेटीचे कुलूप तोडून रोकड व चांदीच्या वस्तूंवर हात साफ केला.

दरम्यान, पहाटे पाचच्या सुमारास काही भाविक दर्शनासाठी मंदिरात आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. याची माहिती तत्काळ आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे व डोंगरकडा पोलीस चौकीचे जमादार संतोष नागरगोजे यांना देण्यात आली.

Hingoli Crime News
Paratur temple theft : वीस दिवस उलटूनही चोरांचा थांगपत्ता नाही!

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासासाठी हिंगोली येथील श्वान पथक व ठसे तज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने मंदिर परिसरात शोध घेत मागील दरवाजापर्यंत माग काढला. यावरून चोरट्यांनी याच मार्गाने प्रवेश करून पलायन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, पुढील माग काढण्यात यश आले नाही. ठसे तज्ञांकडून तपास सुरू आहे.

या प्रकरणी जटाशंकर देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब आडकिणे यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संतोष नागरगोजे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news