

Hostel abuse case: Main accused teacher Patve arrested
आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील येडशी तांडा येथील वसतिगृहातील अनुचित प्रकार करणाच्या आखाडा बाळापूर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. तर या प्रकरणात पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन केले असून वसतिगृहातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले जाणार आहे. या शिवाय काही मुलींनी जबाबही नोंदवले आहेत.
कळमनुरी तालुक्यातील येडशी तांडा येथील बसतिगृहात शिक्षक महालिंग पटवे याने अनुचित प्रकार केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी बुधवारी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हा दाखल होताच मुख्य आर-ोपी समजल्या जाणाऱ्या शिक्षक महालिंग पटवे हा फरार झाला होता.
मात्र घटनेचे लक्षात पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, उपाधीक्षक राजकुमार केंद्रे यांनी स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. यामध्ये पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुढे, उपनिरीक्षक गणेश घोटके, जमादार शेख बाबर, शिवाजी पवार यांच्या पथकाने तातडीने वसतिगृह अधीक्षक मोहन जाधव याला अटक केली. त्यानंतर गुरुवारी शिक्षक महालिंग पटवे याला अटक केली आहे. या प्रकरणात महिला पोलिस उपनिरीक्षक प्रणिता ढोरे यांच्या पथकाने वसतिगृहातील काही मुलींना विश्वासात घेऊन त्यांचे जवाब नोंदवले.
यामध्ये बहुतांश मुलींनी सदर घटना घडल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आता पुरावे गोळा करण्यास सुरवात केली असून यामध्ये वसतिगृहातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले जाणार आहे. त्यासाठी पोलिसांनी शाळा प्रशासनाला पत्र देऊन फुटेजची मागणी केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गांभीर्याने तपास चालविला आहे.
या प्रकरणात शिक्षक महालिंग पटवे याची पार्श्वभूमी तपासण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे आहेत काय याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. तर पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत त्याने मी हा प्रकार केलाच नसल्याचे सांगितले.