Electricity Supply : शेतकऱ्यांना दोन ते तीन तासच वीजपुरवठा

वीज वितरणचा हलगर्जीपणा, हळद, तुरीचे पीक धोक्यात, शेतकऱ्यांमध्ये रोष
Electricity Supply
Electricity Supply : शेतकऱ्यांना दोन ते तीन तासच वीजपुरवठाfile photo
Published on: 
Updated on: 

Farmers receive electricity supply for only two to three hours

आखाडा बाळापूर : पुढारी वृत्तसेवा दुष्काळी परिस्थितीवर मात करत मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी शेतातील पिके जगवली आहेत. आता हळद, तूर यांसह इतर पिके काढणीच्या उंबरठ्यावर असताना महावितरणच्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. कृषी पंपांसाठी शासनाने दिवसा आठ तास वीजपुरवठा देण्याचे नियोजन केले असताना प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना दोन ते तीन तासच वीज मिळत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

Electricity Supply
Hingoli News: आकोलीत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; हप्ता बंद झाल्याने कारवाई झाली का? गावकऱ्यांचा सवाल

सध्या परिसरातील कॅनॉलला पाणी आलेले असून शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मात्र, वीजपुरवठा सुरळीत नसल्याने कॅनॉलचे पाणी असूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. कॅनॉलचे पाणी निघून गेल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करून काय उपयोग, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

परिसरातील अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांवरील तारा तुटलेल्या, जळालेल्या तसेच खराब झालेल्या आहेत. काही ठिकाणी तांत्रिक बिघाड निर्माण झाले आहेत. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांकडून या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना फोन केला असता अनेकदा फोन उचलला जात नाही किंवा फोन बंद असल्याचा अनुभव येत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे.

Electricity Supply
Vasmat Hospital Viral Video | वसमत उपजिल्हा रुग्णालयात सिझर ऑपरेशनसाठी पैशांची मागणी; व्हिडिओ व्हायरल

शासनाने कृषी पंपांसाठी दिवसा आठ तास वीज देण्याचा निर्णय घेतला असताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळत नाही. शासनाकडून वीज उपलब्ध करून स्थानिक दिली जात असतानाही पातळीवरील नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नसल्याने शासनाचीही बदनामी होत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले हळद, तूर व इतर पिके पाण्याअभावी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून कृषी पंपांचा वीजपुरवठा नियोजनानुसार आठ तास सुरू ठेवावा, खराब वीजतारा बदलून जळालेले साहित्य दुरुस्त करावे तसेच शेतकऱ्यांचे फोन न उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष गजानन बोंढारे पाटील यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.