Illegal Sand Extraction : जिल्ह्यात तीन ठिकाणी अवैध वाळू उपसा करणारी वाहने पकडली

१८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल
Illegal Sand Extraction
Illegal Sand Extraction : जिल्ह्यात तीन ठिकाणी अवैध वाळू उपसा करणारी वाहने पकडलीfile photo
Published on: 
Updated on: 

Hingoli News: Vehicles engaged in illegal sand extraction seized at three locations in the district

कळमनुरी/वसमत : पुढारी वृत्तसेवा कळमनुरी तालुक्यात दोन तर वसमत तालुक्यात एका ठिकाणी महसूल व पोलिस विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये तीन वाहनांसह १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.

Illegal Sand Extraction
Electricity Supply : शेतकऱ्यांना दोन ते तीन तासच वीजपुरवठा

कळमनुरी तालुक्यातील गौळबाजार शिवारात अवैध वाळू वाहतुक होत असल्याच्या माहितीवरून मंडळ अधिकारी प्रेमदास चव्हाण, आनंद काकडे, ग्राम महसूल अधिकारी एकनाथ कदम, प्रितीक पालखडे, महेश गळाकाटु, विजय भंडारे, कमलकिशोर यादव, विकास पंडीत यांच्या पथकाने गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास वाहनांची तपासणी केली. यामध्ये एका ट्रॅक्टरमधून अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. त्यावरून पथकाने ट्रॅक्टर व वाळू असा सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल कळमनुरी: पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांसह मुद्देमाल जप्त केला.

जप्त केला. या प्रकरणी प्रेमदास चव्हाण यांच्या तक्रारीवरून चालक गोपाल जारंडे (रा. वाकोडी) याच्याविरुध्द कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या शिवाय कळमनुरी तालुक्यातील रेणापूर ते सावंगी रोडवर महसूल विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीमध्ये एक ट्रॅक्टरमधून अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून ट्रॅक्टर व वाळू असा ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गणेश नागरे (रा. खेड) याच्या विरुध्द कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Illegal Sand Extraction
Hingoli News: आकोलीत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; हप्ता बंद झाल्याने कारवाई झाली का? गावकऱ्यांचा सवाल

वसमत तालुक्यातील पिंपळगाव कुटे शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात हट्टा पोलिसांच्या पथकाने केलेल्या पाहणीमध्ये एका टिप्परमधून अवैधरीत्या वाळू वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी टिप्पर व वाळू असा ८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी जमादार किशोर कवठेकर यांच्या तक्रारीवरून रामराव सब्बनवार (रा. परभणी) याच्या विरुध्द हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.