Hingoli Crime : डोंगरकडा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
आखाडा बाळापूर : आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 11 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व मोबाईल असा सुमारे 2 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
डोंगरकडा फाटा येथील मोकळ्या जागेत काहीजण पैसे लावून हारा-जीता नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 6 मार्च रोजी सकाळी सुमारे 11.15 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला.
या कारवाईत राजेश गेंडलाल जैस्वाल (रा. डोंगरकडा), देवानंद प्रभू सराटे, दुर्गादास बापूराव अडकीने, किसन तुकाराम गावडे, शिवलाल किसन राठोड, बाळाजी भिमराव गावडे, दिलीप माधवराव कुंभारकर, सुरेश युवराज पवार, मधुकर रामराव गावडे, प्रकाश खिचे राठोड, मोहन कचरू राठोड आदी 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपींकडून रोख रक्कम, विविध कंपन्यांचे अँड्रॉइड मोबाईल तसेच जुगाराचे पत्ते असा एकूण 2 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक नागरोजे करीत आहेत. ही कारवाई पोलिसांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केली असून परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.

