Hingoli News : माळवटा पाटीजवळ गोवंश मांस वाहतूक करणारा ऑटो जळालेल्या अवस्थेत; पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले
Hingoli News : माळवटा पाटीजवळ गोवंश मांस वाहतूक करणारा ऑटो जळालेल्या अवस्थेत; पोलिसांकडून तपास सुरू
Published on
Updated on

वसमत : तालुक्यातील माळवटा पाटी परिसरात गोवंश मांसाची वाहतूक केल्याचा संशय असलेला एक ऑटो जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि.२३) पहाटे अंदाजे चार वाजण्याच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

Hingoli News : माळवटा पाटीजवळ गोवंश मांस वाहतूक करणारा ऑटो जळालेल्या अवस्थेत; पोलिसांकडून तपास सुरू
Abhijit Dipke Hingoli News : पिंपळदरीची शाळा देश पातळीवर नेणार; अभिजीत दिपके

प्राप्त माहितीनुसार, संबंधित ऑटोमधून गोवंश मांसाची वाहतूक केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने हा ऑटो पेटवून दिल्याचे सांगण्यात येत असून, या घटनेमागील नेमके कारण आणि ऑटो पेटविणारी व्यक्ती कोण, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Hingoli News : माळवटा पाटीजवळ गोवंश मांस वाहतूक करणारा ऑटो जळालेल्या अवस्थेत; पोलिसांकडून तपास सुरू
Hingoli news: 'पहिले आमच्यावर गोळ्या झाडा,मगच जमीन घ्या...!'; १४ वर्षांच्या मुलाचा थेट इशारा

घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील चौकशी सुरू केली आहे. ऑटो कोणाच्या मालकीचा आहे, त्यातून नेमके कोणत्या प्रकारचे मांस वाहून नेले जात होते, ते कोठून आणण्यात आले व कुठे नेण्यात येत होते, तसेच वाहनाला आग कोणी आणि कशासाठी लावली, या सर्व बाबींचा पोलीस तपासातून उलगडा होणे अपेक्षित आहे.

Hingoli News : माळवटा पाटीजवळ गोवंश मांस वाहतूक करणारा ऑटो जळालेल्या अवस्थेत; पोलिसांकडून तपास सुरू
Hingoli News | ग्रामसेवकाच्या उत्तराअभावी ग्रामस्थ आक्रमक; माटेगाव ग्रामसभा बंद पाडली

दरम्यान, ‘व्हाईस ऑफ मीडिया’चे पत्रकार अभ्यास दौऱ्यावर असताना सकाळी सुमारे सात वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची माहिती घेतली. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांच्या अधिकृत तपासातून समोर येणाऱ्या माहितीची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे. घटनेचा पुढील तपास वसमत ग्रामीण पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news