Aundha Nagnath Temple Hingoli: औंढा नागनाथमध्ये नागपंचमी अन् पहिल्या श्रावण सोमवाराच्या सुवर्णयोगाने उजळले वातावरण

'बम बम भोले'च्या गजरात हजारो भाविकांची गर्दी...
 Aundha Nagnath Temple Hingoli: औंढा नागनाथमध्ये नागपंचमी अन् पहिल्या श्रावण सोमवाराच्या सुवर्णयोगाने उजळले वातावरण
Published on
Updated on

औंढा नागनाथ : येथे तीर्थक्षेत्र आद्य आठव नागेश्वर नागनाथ ज्योतिर्लिंग असलेल्याने नागपंचमीचे औचित्य साधून आणि श्रावण सोमवार ची पर्वणी असल्याने भाविकांचा दर्शनासाठी जनसागर उसळला. औंढा नागनाथ येथे श्रावणातील नागपंचमीच्या पूर्वसंध्येला पंचक्रोशीतून भजनी मंडळ ,दिंड्या, कावडी , मंडळ आणि भाविक भक्त रात्रभर भजन ,पूजन करून नागपंचमीला नागेश्वराचे दर्शन घेऊन नागपंचमी साजरी करतात.

 Aundha Nagnath Temple Hingoli: औंढा नागनाथमध्ये नागपंचमी अन् पहिल्या श्रावण सोमवाराच्या सुवर्णयोगाने उजळले वातावरण
Hingoli News | ग्रामसेवकाच्या उत्तराअभावी ग्रामस्थ आक्रमक; माटेगाव ग्रामसभा बंद पाडली

यावर्षी श्रावणातील पहिला श्रावण सोमवार व नागपंचमी हा सुवर्णयोग भाविकांसाठी फार मोठी पर्वणी ठरला. बम बम भोले, हर हर महादेवाच्या गजरात हजारो भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले. उत्तर रात्री एक वाजता नागनाथ मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे यांच्या हस्ते नागनाथाची विधिवत महापूजा, रुद्राभिषेक करून पहाटे दीड वाजता मंदिर शिवभक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. आ.राजू नवघरे यांनीही नागनाथाचे दर्शन घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना शासन दरबारी रोखठोक मांडण्यासाठी सद्बुद्धी देऊन पीक पाणी उत्तम येऊ देण्यासाठी साकडे घातल, पो.अधी, श्रेणिक लोंढा यांनी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करून समाधान व्यक्त करत कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही म्हणून पो.निरी.शामकुमार डोंगरे यांना विशेष सूचना दिल्या.

 Aundha Nagnath Temple Hingoli: औंढा नागनाथमध्ये नागपंचमी अन् पहिल्या श्रावण सोमवाराच्या सुवर्णयोगाने उजळले वातावरण
Abhijit Dipke Hingoli News : पिंपळदरीची शाळा देश पातळीवर नेणार; अभिजीत दिपके

कालपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्याने मंदिर परिसर प्रचंड भाविकांच्या गर्दीने फुलला होता. नागनाथ संस्थांनचे अध्यक्ष, तहसीलदार हरीश गाडे, अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ सुरक्षा प्रमुख बबन सोनवणे, जगदेव दिंडे, मुकेश पडोळे, गणेश जगताप, नागेश माने, कृष्णा पाटील ,नामदेव पाटील, रामप्रसाद उदगीरे, देवा देशमुख, प्रवीण गोबाडे ,दशरथ राठोड, नितीन दराडे, यांच्यासह नागनाथ संस्थांचे सर्वकर्मचारी भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी विशेष परिश्रम घेत होते.

 Aundha Nagnath Temple Hingoli: औंढा नागनाथमध्ये नागपंचमी अन् पहिल्या श्रावण सोमवाराच्या सुवर्णयोगाने उजळले वातावरण
Hingoli News : 'शक्तिपीठ' मोजणी पथकाला पिटाळले

पोलीस अधीक्षक श्रेणिक लोंढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुमार वाघ, यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्याम कुमार डोंगरे, पो. उपनिरी. अमोल इंगोले,शेख खुदस, शेख आयुब, श्रीधर वाघमारे, यशवंतगुरु पवार ,जमा. रविकांत हरकाळ, बबन चव्हाण, जयदीप जाधव, देविदास राठोड, यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. रात्री उशिरापर्यंत हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. वाहनाची वर्दळ वाढल्याने मंदिर परिसर , बस स्थानक परिसर, औंढा हिंगोली मुख्य रस्त्यावर वाहनांची गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तात्काळ औंढा नागनाथ पोलिसांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news