Kharif crop hingoli : गोरेगावसह परिसरात पेरणीनंतर पाऊस नसल्याने शेतकरी हतबल

monsoon break hingoli farmers crisis : उगवले पीक जळण्याच्या मार्गावर, तातडीने मदतीची मागणी
Kharif crop hingoli : गोरेगावसह परिसरात पेरणीनंतर पाऊस नसल्याने शेतकरी हतबल
Published on
Updated on

गोरेगाव : मान्सूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर विश्वास ठेवून गोरेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद यांची पेरणी पूर्ण केली. मात्र पेरणीनंतर गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पाऊस पूर्णपणे थांबल्याने उगवलेले पीक आता करपून जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे.

Kharif crop hingoli : गोरेगावसह परिसरात पेरणीनंतर पाऊस नसल्याने शेतकरी हतबल
Kharif crops at risk in Nanded : बीज अंकुरले, पण आभाळाने फिरवली पाठ; नायगावात पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजाचे डोळे पाणावले

पेरणी झाली, पण पाणी नाही

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी एकदिलाने पेरण्या उरकल्या. जमिनीत चांगली ओल होती. मात्र त्यानंतर ढग दाटून येतात आणि निघून जातात, अशीच परिस्थिती आहे. रिमझिम पावसानेही हजेरी लावली नाही. सध्या शेतातील सोयाबीन 2 ते 3 पानांवर आहे. कापसाची रोपेही कोवळी आहेत. ओल नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी रोपे पिवळी पडून जळू लागली आहेत.

Kharif crop hingoli : गोरेगावसह परिसरात पेरणीनंतर पाऊस नसल्याने शेतकरी हतबल
Khalapur Paddy Sowing Delay: लहरी हवामानामुळे भातशेतीचे नियोजन बिघडले; बळीराजा चिंतेत

दुबार पेरणीचे संकट

"आम्ही कर्ज काढून बियाणे, खत, औषध आणले. पेरणी केली. आता 20 दिवस झाले पाऊस नाही. जर येत्या 3-4 दिवसात पाऊस नाही आला तर पुन्हा पेरणी करावी लागेल. त्यासाठी पुन्हा 8 ते 10 हजार रुपये खर्च येईल,अशी व्यथा गोरेगाव येथील शेतकरी यांनी व्यक्त केली. परिसरातील शेतकरी सध्या आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. विहिरी, बोअरवेलमध्येही पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे फवारणी किंवा ठिबकने पाणी देणेही शक्य नाही.

Kharif crop hingoli : गोरेगावसह परिसरात पेरणीनंतर पाऊस नसल्याने शेतकरी हतबल
Canacona Chili Crop Damage | काणकोण तालुक्यात बळीराजा संकटात! पाऊस लांबल्याने मिरचीसह इतर फळभाज्यांची पिके धोक्यात

कृषी विभागाने पाहणी करावी

शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने गावोगावी भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करावी. तसेच दुबार पेरणीसाठी अनुदान, बियाणे अनुदान आणि पीक विम्याची अग्रिम रक्कम उपलब्ध करून द्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news