Hingoli Robbery Case | फ्लिपकार्टचा कंटेनर लुटला: रिसोड येथील कंपनीच्या माजी व्यवस्थापकासह ८ दरोडेखोरांना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

अन्य दोघांचा शोध सुरु, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची माहिती
 Flipkart Container Robbery in Risod
फ्लिपकार्टचा कंटेनर लुटणाऱ्या ८ दरोडेखोरांना हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.(Pudhari Photo)
Published on
Updated on

 Flipkart Container Robbery in Risod 

हिंगोली : वसमत तालुक्यातील भेंडेगाव शिवारात फ्लिपकार्टचे पार्सल वाहतूक करणारा कंटेनर अडवून पार्सल लुटणार्‍या ८ दरोडेखोरांना हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून एक पिकअप, एक कार, दोन मोबाइलसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अन्य दोघांचा शोध सुरु असल्याचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज (दि.१६) पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, विक्रम विठुबोने आदी उपस्थित होते.

 Flipkart Container Robbery in Risod
Turmeric Cultivation | हिंगोली जिल्ह्यात ४० हजार हेक्टरवर होणार हळदीची लागवड; अडीच लाख रोपे तयार

याबाबत अधिक माहिती अशी की, कुरुंदा पोलिस ठाण्यांतर्गत भेंडेगाव शिवारात ११ जूनरोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी कंटेनर अडवून चालक व वाहक यांना मारहाण केली होती. त्यानंतर कंटेनरमधील पार्सलची पाकिटे एका कारमध्ये टाकून पळविण्यात आली. या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, रामदास निरदोडे, गजानन बोराटे, उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, दिलीप मोरे, प्रविण आगलावे, आझम प्यारेवाले, प्रेम चव्हाण, पांडूरंग राठोढ़ड, नितीन गोरे, गजानन पोकळे, लिंबाजी वाहुळे हरिभाऊ गुंजकर, किशोर सावंत यांच्यासह पोलिसांचे पथक स्थापन केले होते.

या पथकाने तांत्रिक तपास व गुन्हेगारांची माहिती घेतल्यानंतर कंपनीच्या वाहनाचे जुने चालक नागनाथ राऊत, मारोती भुताडे (रा. नांदेड) यांना ताब्यात घेतले. त्यांनी रिसोड कार्यालयातील माजी व्यवस्थापक सर्वेश धुत याने टीप दिल्याचे सांगितले. त्यानंतर आठ जणांनी कंटेनरचा पाठलाग करून लुटल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात पोलिसांनी ज्ञानेश्वर खानजोडे, परमेश्वर चौधरी, शंकर काळे, मंगेश काटे, मोहमद युसुफ, अभिषेक हलगे, सर्वेश धुत (सर्व रा. रिसोड), यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून फ्लिपकार्टचे लुटलेले १ हजार २४५ पार्सल व कार, एक पिकअप असा २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरीत दोन आरोपींचा शोध सुरु असून त्यासाठी पथके रवाना करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी स्पष्ट केले.

 Flipkart Container Robbery in Risod
हिंगोली जिल्ह्यातील कुख्यात चोरट्यांचे गडमुडशिंगी, शिरोली कनेक्शन उघडकीस

हा गुन्हा घडल्यानंतर कुठलाही पुरावा नसताना गुन्हे शाखेचे तांत्रिक तपासा सोबतच इतर माहिती घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. त्याबद्दल गुन्हे शाखेला १० हजारांचे पारितोषिक पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी जाहीर केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news