हिंगोली: धानोरा येथे कुर्‍हाडीने घाव घालून तरुणाचा निर्घृण खून

शेनोडी शिवारात आढळला मृतदेह
Murder at Dhanora
धानोरा येथील सदानंद डोंगरे यांचा शेनोडी शिवारात निर्घृण खून केला. Pudhari News Network
Published on
Updated on

कळमनुरी: पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील धानोरा (जं) येथील राहणार्‍या सदानंद महादू डोंगरे (वय ५०) यांचा शेनोडी शिवारात अज्ञात आरोपीनी कुर्‍हाडीने घाव घालून निर्घृण खून केला. ही घटना आज (दि.८) दुपारी उघडकीस आली.

Murder at Dhanora
हिंगोली : 'पाणंद रस्ता करा अन्यथा हेलिकॉप्टर द्या'; नाही तर आंदोलन

पोलिसांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती

याबाबत अधिक माहिती अशी की, शेनोडी मोरगव्हाण रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती कळमनुरी पोलिसांना मिळाली. सदरची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, सतीश ठेंगे, पोलीस जमादार गजानन होळकर, लक्ष्मीकांत माखणे, अरविंद राठोड, किशोर खिल्लारे, गृहरक्षक दलाचे जवान विलास बांगर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

Murder at Dhanora
हिंगोली : हेमंत पाटील यांच्या पुनर्वसनाचे शिंदे सेनेसमोर आव्हान

पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. श्वानपथक व ठसे तज्ञांच्या पथकास पाचारण करण्यात आले. यामध्ये प्रभाकर शेटे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच ठसे तज्ञांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून प्रथमदर्शनी सदानंद डोंगरे यांचा खून कुर्‍हाडीने घाव घालून झाला असावा, अशी माहिती कळमनुरी पोलिसांनी दिली. पोलीस आरोपीचा व काही पुरावा हाती लागतोय का याचा शोध घेत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news