

Five people booked for showing black flags to Agriculture Minister's convoy
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करण्याच्या मागणीसाठी हिंगोली ते वाशीम मार्गावर कनेरगावनाका शिवारात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाहनाचा ताफा अडवून काळे झेंडे दाखविणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आर-ोपावरून बासंबा पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्ह्यात यावर्षी सततच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुग, उडदाचे पिक हातचे गेले तर त्यानंतर ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, हळद, ज्वारी, तुर या पिकांना फटका बसला आहे. ऑगस्ट महिन्यात केलेल्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यात २.७१ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्री नरहरी झिरवाळ हिंगोलीत आले असतांना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवेदन देऊन जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शनिवारी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे वाशीम कडून हिंगोली मार्गे नांदेड कडे जात असतांना ठाकरे गटाचे पदाधिकारी वसीम देशमुख याच्यासह इतर पदाधिकारी कनेरगाव नाका शिवारात त्यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखविले. हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करा अशी घो-षणाबाजी पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी पदाधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये झटापटही झाली. यावेळी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणी महिला पोलिस कर्मचारी मीना सावळे यांच्या तक्रारीवरून बासंबा पोलिसांनी वसीम देशमुख, दिलशान पठाण, सय्यद मोईस, जुनेद अहेमद, शेख आसिफ यांच्या विरुध्द जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आर- ोपावरून गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे, उपनिरीक्षक मदन गव्हाणे, जमादार गजानन बेडगे पुढील तपास करीत आहेत.