Hingoli Crime : पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धाची अंगठी पळविली

सिंदगी परिसरातील घटना, बाळापूर पोलिसांत गुन्हा दाखल
Gold ring theft
पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धाची अंगठी पळविलीpudhari photo
Published on
Updated on

सिंदगी : कळमनुरी तालुक्यातील सिंदगी परिसरात या भागात चोर फिरत आहेत त्यामुळे हातात अंगठ्या घालून फिरू नका असा प्रेमाचा सल्ला देत दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी वृध्दाच्या हातातील सहा ग्राम वजनाची सोन्याची अंगठी पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत सिंदगी येथील किसनराव मगर हे बुधवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास शेतातून दळण आणण्यासाठी निघाले होते. यावेळी सिंदगी शिवारात दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या समोर दुचाकी उभी केली. परिसरात कोणीही नसल्याचे पाहून त्यांनी किसनराव यांच्याशी संवाद साधला.

Gold ring theft
Ayurvedic college promotion dispute : आयुर्वेदिक महाविद्यालयातील पदोन्नतीचा वाद चव्हाट्यावर !

आम्ही पोलिस असून या भागात चोर फिरत आहेत. त्यामुळे तुम्ही हातातील सोन्याची अंगठी काढून ठेवा असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवत किसनराव यांनी त्यांच्या हातातील अंगठी काढली. दरम्यान, अंगठी चांगली रुमालात गुंडाळून ठेवा असे सांगत भामट्यांनी हातचालाखीने त्यांच्या हातातील अंगठी घेऊन त्या ठिकाणी पितळी अंगठी ठेवून रुमाल त्यांच्या हातात देत धूम ठोकली.

दुचाकीवरील दोघेही गेल्यानंतर किसनराव काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी रुमाल काढून पाहिला अस त्यात पितळी अंगठी असल्याचे दिस आले. आपली फसवणूक झाल्य लक्षात येताच त्यांनी आखाडा बाळा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

Gold ring theft
Beed Crime : आरोपीच्या अटकेसाठी जाधवर कुटुंबावर उपोषणाची वेळ

पोलिसांनी दोन भामट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठे, जमादार पंढरी चव्हाण, शिवाजी पवार पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news