Dry Drought कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

कळमनुरी : पावसाअभावी करपलेल्या सोयाबीनची आमदार रोहित पवारांकडून पाहणी
Dry Drought
Dry Drought कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्याfile photo
Published on
Updated on

Declare a dry drought and provide assistance of ₹50,000 per hectare

कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली.

Dry Drought
Hingoli News| कृषीमंत्री भरणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; सुकलेल्या सोयाबीनची केली पाहणी

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या पावसाअभावी सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांची पिके हातातून गेल्याचे चित्र आहे. शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी आमदार पवार यांनी केली.

यावेळी बोलताना त्यांनी शासनाच्या कर्जमाफीच्या घोषणेच्या अंमलबजावणीवरही प्रश्न उपस्थित पावसाअभावी सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात केला. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात अपेक्षित मदत मिळणे आवश्यकम असल्याचे त्यांनी सांगितले.

Dry Drought
Hingoli News : रोहित्रावर काम करताना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू!

तसेच हे शेतकऱ्यांना तातडीने सरसकट आर्थिक मदत जाहीर करण्याचे आवाहन शासनाला केले. यावेळी स जयंत वानोळे, अॅड. रवी शिंदे, जानकीराम जगताप, मोहन न बागवान बागवान, शिवाजी जगदाळे, उत्तम पातोडे, प्रमोद वडकुते यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news