कॉकरोच पार्टी संस्थापकाच्या गावात जल्लोष

सुशिक्षित बेरोजगारांची समस्या मांडल्याने ग्रामस्थांकडून जाहीर पाठिंबा
Cockroach Janta Party
Cockroach Janta PartyPudhari
Published on
Updated on

Celebrations in the hometown of the Cockroach Party founder.

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा :

सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत भगवान दिपके यांच्या पक्षाला त्यांच्या मूळ गावी, म्हणजेच हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी येथील ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. २१) एकत्र येत जाहीर ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.

Cockroach Janta Party
Abhijeet Dipke: वडील MIDC तील सेवानिवृत्त अभियंता, cockroach janata party च्या अभिजीतच्या गावातील लोकांना काय वाटते?

अभिजीत दिपके पाठिंबा दिला. गावातील कॉकरोच पार्टी तरुणाने बेरोजगारांचा आवाज संस्थापक उठवून देशात नाव केल्याबद्दल काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी बनावट पदव्यांसंदर्भात भाष्य करताना झुरळ शब्दाचा उल्लेख केला होता. या विधानाचा आधार घेत अभिजीत दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली. त्यांनी या पक्षाला आळशी, बेरोजगारांचा आवाज संबोधून तरुणांना एकत्र येण्याचे आवाहन केले. केवळ चेष्टा म्हणून सुरू झालेल्या या मोहिमेला मागील पाच दिवसांत तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, इन्स्टाग्रामवर त्यांचे १.५ कोटीहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. त्यांनी पक्षाची वेबसाईट आणि गाणेही तयार केले आहे.

अभिजीतचे वडील भगवान दिपके हे छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसीमधून इंजिनीअर म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत, तर त्यांचे चुलते विलास दिपके संतुक पिंपरी येथे राहतात. अभिजीतच्या या मोहिमेची दखल घेत गावकऱ्यांनी गावात घोषणाबाजी करत पक्षाला पाठिंबा दर्शवला.

Cockroach Janta Party
Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीचा देशात डिजिटल स्फोट

अभिजीत सोशल मीडियावरील कॅम्पेनिंगमधील बडा खेळाडू

अभिजीत दीपके हे सोशल मीडियावरील कैम्पेनिंगमधील बडा खेळाडू आहेत. त्यांनी २०२० ते २०२३ या काळात त्यांनी आम आदमी पार्टीच्या (आप) केंद्रीय सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक आणि डिजिटल रणनीतीकार म्हणून काम पाहिले होते.

२०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने मिळवलेल्या मोठ्या विजयामागे त्यांच्या डिजिटल मोहिमांचा महत्वाचा वाटा होता. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री कार्यालय (सीएमओ) आणि दिल्लीच्या शिक्षण विभागाचे कम्युनिकेशन अॅडव्हाझर म्हणूनही काम पाहिले आहे. नॅरेटिव्ह बिल्डिंग तयार करणे आणि इंटरनेटवरील तरुणांची नाडी ओळखण्यात ते पारंगत आहेत.

अभिजीत दिपके यांनी सुशिक्षित बेरोजगारांची समस्या मांडून तरुणांचा आवाज उठवला आहे. सामान्य माणसाचा आवाज बनून काम करणाऱ्या अभिजीतचा आम्हाला अभिमान असून, संपूर्ण गाव त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.
विजय पुरी (सरपंच, संतुक पिंपरी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news