

Beaten with an iron rod for a minor reason
वसमत, पुढारी वृत्तसेवा : शहरातील शुक्रवार पेठ भागात आमच्या वस्तीत का आलात या किरकोळ कारणावरून लोखंडी रॉड, काठ्यानी मारहाण करून घरावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी १२ जणांवर शुक्रवारी पहाटे मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
शहरातील सिद्धार्थ कांबळे हे त्यांच्या मित्रासह गुरुवारी रात्री शुक्रवार पेठ भागात गेले होते. यावेळी त्या ठिकाणी दहा ते बारा जण एकत्र आले. त्यांनी तुम्ही आमच्या वस्तीमध्ये कशासाठी आलात या कारणावरून वाद उकरून काढत मारहाण करण्यास सुरवात केली.
करण्याची संधी मिळाली नाही. यावेळी सिद्धार्थ व त्यांच्या मित्रांना लोखंडी रॉड व काठ्यानी मारहाण केली. या मारहाणीत दोघे जण जखमी झाले. त्यानंतर या जमावाने एका घरावर जाऊन दगडफेक केली तसेच घरातील साहित्याची नासधूस केली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस उपाधीक्षक, पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहायक पोलिस निरीक्षक शंकर डेडवाल यांनी वाढीव पोलिस बंदोबस्त घेऊन घटनास्थळ गाठले. पोलिस आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
याप्रकरणी सिद्धार्थ यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख शोएब, शेख असलम, शेख शकील, शेख अबीद, शेख अरबाज, शेख शहबाज यांच्यासह इतर सहा जणांवर मारहाण करणे तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.