Changing food serving traditions : पत्रावळी व केळी पानावर मेजवानी आठवणीतच राहणार

आता केळी पानाची जागा कागदाची पत्रावळी तर पानाच्या पत्रावळी जागेवर विविध प्रकारचा पत्रावळी वापर
Changing food serving traditions
पत्रावळी व केळी पानावर मेजवानी आठवणीतच राहणार pudhari photo
Published on
Updated on

जवळा बाजार : सार्वजनिक विविध धार्मिक कार्यक्रम व विवाह सोहळ्यात पंगतीतील मंडळीस भोजन करण्यास पानाची पत्रावळी व केळी पानाचा मोठ्याप्रमाणात वापर करण्यात येत होता, पण आता केळी पानाची जागा कागदाची पत्रावळी तर पानाच्या पत्रावळी जागेवर विविध प्रकारचा पत्रावळी वापर उपलब्ध झाल्यामुळे आता पानाची पत्रावळी व केळी पानावर भोजनाचा आस्वाद आठवणीतच राहणार अशी परिस्थितीत मोठ्याप्रमाणात पहावयास मिळत आहेत.

ग्रामीण भागात किवा शहरात मोठ्याप्रमाणात विविध धार्मिक कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम, विवाह सोहळ्यात पंगतीत भोजन करण्यास केळीचा पानावर व पानाचा पत्रावळी वापर मोठ्याप्रमाणात करण्यात येत होता पण कालांतराने पानाचा पत्रावळी व केळी पान वापर कमी प्रमाणात होण्यास सुरुवात झाली कारण आता भोजन करण्यास मोठ्याप्रमाणात विविध कागदी पत्रावळी, पानांची विविध पत्रावळी, विविध ताटाचा आकाराची थाली निर्माण झाल्यामुळे त्यातच केळी लागवड कमी प्रमाणात होत असल्याने केळी पान उपलब्ध होत नाहीत तर नवनवीन भोजन करण्यास थाली, प्लेट, चमचे उपलब्ध झाल्यामुळे भोजन झाला नंतर सर्व कचराकुंडीत टाकावे लागत असल्याने व पाणी पिण्यास मोठ्याप्रमाणात पानीबॉटल व झार आणि प्लास्टिक ग्लास उपलब्ध होत आहेत.

Changing food serving traditions
Traffic police save life : वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने व्यक्तीला जीवदान

या नवनवीन सुविधा उपलब्ध होत असल्याने मनुष्य बळ कमी लागत आहेत. एकंदरीत सध्याच धकाधकीचा जीवनात विविध धार्मिक कार्यक्रम व विवाह सोहळ्यात पंगतीतील मंडळीस भोजन आस्वाद घेण्यास मोठ्याप्रमाणात विविध सुविद्य उपलब्ध होत असल्याने अगोदर केळी पान व पानाची पत्रावळी वरिल भोजन करण्याचा आस्वाद कालांतराने मात्र आठवणीतच राहणार आहेत.

Changing food serving traditions
RFID tracking recruitment : पोलिस भरतीत आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news