Aundha Nagnath temple : 193 कोटींच्या आराखड्यास मंजुरी

औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाला मिळणार चालना
Aundha Nagnath temple
Aundha Nagnath templepudhari photo
Published on
Updated on

औंढा नागनाथ : देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे १९३ कोटी रुपयांच्या तिर्थक्षेत्र विकास आराखड्याला गुरुवारी शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील काळात भक्तनिवास, प्रतीक्षा कक्ष, म्युझियमसह हरिहर तलावाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. नवीन आराखड्यानुसार भक्तांना दर्शनासाठी कमी वेळ लागेल याबाबतचे नियोजन केले जाणार आहे.

मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आमदार संतोष बांगर, प्रवीण दटके, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Aundha Nagnath temple
Purna farmers rain crisis : पिकांनी माना टाकल्या; पावसासाठी शेतकऱ्यांचे वरुण राजाकडे साकडे

यावेळी औंढा नागनाथ मंदिराच्या १९३ कोटी ५५ लाख रुपांच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. या मंदिरावरील पुरातन शिल्पकलेचे जतन करत नैसर्गिक रंगांचा वापर करुन त्याचे संवर्धन करण्यात यावे. तलाव आणि मंदिर परिसरात वापरले जाणारे दगड आणि इतर साहित्य त्याचप्रमाणे एकूणच सर्व कामे दर्जेदार असावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास करताना मंदिराचे वैभव जपण्याचे निर्देश दिले. तर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जतन आणि संवर्धनाबरोबरच भाविकांसाठी चांगल्या सोयी-सुविधा निर्माण करण्याची सूचना केली.

औंढा नागनाथ मंदिराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार असून यामध्ये मंदिराच्या आवारातील नंदी मंडप, ओवरी आणि दर्शन बारी या मंदिराच्या आवारातील वास्तूंचे संवर्धन केले जाणार आहे. यासह हरीहर तलाव आणि परिसरातील मंदिरांचे संवर्धन आणि जीर्णोद्धार केला.जाणार आहे.

Aundha Nagnath temple
Jalna vegetable market rates : जालना बाजार समितीत कांदा ४,५००; अद्रक १६ हजारांवर !

मंदिर परिसरासाठी बाह्य विद्युतीकरण, सीसीटीव्ही, रोषणाई आणि उद्यान विकास देखील केला जाणार आहे. भक्त निवासाची नव्याने उभारणी केली जाणार असून २५०० क्षमतेचा प्रतीक्षा कक्ष असणार आहे. भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळावे, यादृष्टीने याचे नियोजन केले जाणार असून दर्शन रांगेत भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

  • मंदिराचे वैभव कायम राखून मोठी झाडे लावणे, परिसराला दगडी बांधकामासारखा साज देणे, परिसरात सापडलेल्या जुन्या मूर्ती विकांना पाहता याव्यात यासाठी म्युझियम तयार करणे, भाविकांना माहिती देण्यासाठी माहिती केंद्र उभारणे आदी कामे केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सादरीकरणाद्वारे दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news