Jalna vegetable market rates : जालना बाजार समितीत कांदा ४,५००; अद्रक १६ हजारांवर !

भाजीपाला-फळांच्या बाजारात चढ-उतार
Vegetable
VegetablePudhari
Published on
Updated on

जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व फळांची आवक वाढत आहे. बाजार समितीने जाहीर केलेल्या दरपत्रकानुसार विविध शेतमालाच्या दरात चढ-उतार पहायला मिळत आहे. अद्रकचे भाव कमाल १६ हजार रुपये प्रतिक्विंटल असून कांद्याला कमाल ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहेत.

बाजार समितीच्या दरपत्रकानुसार अद्रकची आवक १५.२ क्विंटल असुन भाव किमान २ हजार ८००, कमाल १६ हजार आहेत. सरासरी भाव ९ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. लसण कमाल १४ हजार व सरासरी ७ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलचे भाव आहेत.

Vegetable
Jalna farmer crop loss : दोन एकरवरील ऊस जळून खाक, शॉर्टसर्किट झाल्याने आग

कांद्याची आवक २३.४ क्विंटल असून भाव १ हजार, कमाल ४ हजार ५०० आणि सरासरी २ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. बटाट्याची आवक ४९.६ क्विंटल असून भाव किमान ३००, कमाल १ हजार ३०० व सरासरी ७०० रुपये प्रतिक्विंटल आहेत.

भाजीपाल्यात हिरवी मिरचीला कमाल १,५०० रुपये, टोमॅटोला १ हजार, गवारला ४ हजार, कारल्याला २ हजार ५००, भोपळ्याला ३ हजार, फुलकोबीला १ हजार ५०० आणि मका २ हजार ३०० रुपये असे प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाले. कोथिंबिरीला कमाल १५० रुपये जुडी, मेथीला २५०, पालकाला २००, शेपूला १५० आणि पुदिन्याला ४०० रुपये जुडीपर्यंत दर नोंदविण्यात आला.

फळभाज्या व भाजीपाल्याच्या दरात आवक आणि मागणीनुसार दररोज बदल होत असल्याचे चित्र असून, शेतमाल बाजारात आणण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बाजारभावाची माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Vegetable
Jalna water shortage : जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद ; ३६ लघु प्रकल्पांनी गाठला तळ !

भाजीपाल्याचे ठळक बाजारभाव

  • अद्रक : १६,००० -९,५०० प्रति

  • क्विंटल, लसूण : १४,०००-

  • ७,३००, कांदा : ४,५००-२,४००, गवार : ४,००० -२,५००, भोपळा : ३,०००-

  • २,०००, कारले : २,५००-

  • २,०००, मका : २,३०० -

  • १,५००, हिरवी मिरची : १,५००

  • -१,०००, बटाटा : १,३०० -

  • ७००, टोमॅटो : १,००० -७५०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news