औंढा नागनाथ : पुढारी वृत्तसेवा – औंढा नागनाथ येथील पंचायत समितीच्या घरकुल योजनेतील एका कर्मचाऱ्याची चौकशी करण्याचे निवेदन आयुक्तालयाकडे देण्यात आले आहे. या प्रखरणी आझाद समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजीव वाट यांनी चौकशीची मागणी केली आहे. घरकुल योजनेत कार्यरत असलेल्या पठाण नावाच्या कर्मचाऱ्याने एकाच नावावर एकाच लाभधारकाला दोन वेळा लाभ दिला. एकाच कुटुंबामध्ये दोन ते तीन घरकुल बांधण्यासाठी सुद्धा लाभ दिल्याचे यात म्हटले आहे.
संबंधित बातम्या –
महिन्यापूर्वी औंढा नागनाथ पंचायत समिती कार्यालयात अशा प्रकारची तक्रार दाखल केली होती. परंतु कोणतीही कार्यवाही झाली नाही. एकाच कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तीला लाभ देण्यामागे ग्रामसेवक जबाबदार असल्याचे संबंधित कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले. लाभ न मिळाल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकाऱ्याने दिल्याशिवाय घरकुल मंजूर होत नसून या योजनेत त्यांना लाभ मिळत असल्याचे कळते.
कामाचा व्याप अधिक असल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची बदली होऊनही याच ठिकाणी काम आटोपण्याचे आदेश गटविकास अधिकारी बालाजी गोरे यांनी दिले. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यास आपला पदभार इतर कर्मचाऱ्याला देता आला नसल्याची सुद्धा बाब उघड झालीय.