Hingoli Crime News : आईला त्रास देणाऱ्या मद्यपी भावाचा लोखंडी रॉडने वार करून खून

वसमतमधील घटना, पोलिसांनी आरोपीस घेतले ताब्यात
Hingoli Crime News
Hingoli Crime News : आईला त्रास देणाऱ्या मद्यपी भावाचा लोखंडी रॉडने वार करून खूनFile Photo
Published on
Updated on

Alcoholic brother who harassed his mother murdered with an iron rod

वसमत, पुढारी वृत्तसेवा येथील जयनगर भागात दारू पिऊन आईला त्रास देणाऱ्या भावाचा एकाने लोखंडी रॉडने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भावासह आईवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आधी पायऱ्यावरून पडल्याची माहिती दिली होती. मात्र पोलिसांनी अधिक तपास करताच खुनाचा उलगडा झाला. प्रवीण रामराव गाडेकर (३८) असे मृताचे नाव आहे.

Hingoli Crime News
Sambhajinagar Crime : गवळीशिवरा शिवारात महिलेचा निर्घृण खून

या विषयी अधिक माहिती अशी की, येथील जयनगर भागात प्रवीण रामराव गाडेकर (३८) हे त्यांच्या आई सोबत राहात होते. त्यांचे पत्नीसोबत पटत नसल्याने पत्नी मुलांना घेऊन बाहेरगावी राहते. त्यामुळे प्रवीण व त्यांची आई दो घेच घरी राहतात. तर एक भाऊ माधव गाडेकर हा पुणे येथे कुटुंबासह राहतो.

दरम्यान, पुणे येथे राहणारा माधव हा मुलीच्या शिक्षणासाठी प्रमाणपत्र काढण्यासाठी वसमत येथे आला होता. सोमवारी दुपारी प्रवीण दारू पिऊन घरी आला. यावेळी तो आईला भांडत होता. सदर प्रकार पाहिल्यानंतर माधव याने प्रवीण यांच्या पायावर, हातावर व छातीवर लोखंडी पाईपने वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन प्रवीण यांचा मृत्यू झाला.

Hingoli Crime News
Jalna Crime : सासूच्या अंत्यविधीला आलेल्या जावयाची दगडाने ठेचून हत्या

या घटनेमुळे माधव व त्याची आई सीताबाई दोघेही घाबरून गेले. या घटनेची माहिती सीताबाई यांनी वसमत शहर पोलिस ठाण्यात दिली. यामध्ये प्रवीण हे पायऱ्यावरून घसरून पडल्याने मयत झाल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाड, सहायक पोलिस उपनिरीक्षक बालाजी मिरासे, जमादार गजानन भोपे, बंदूके यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी मयत प्रवीण यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. उत्तरीय तपासणीच्या अहवालात प्रवीणच्या अंगावर जखमा असल्याचे दिसून आले. यामुळे संशय आल्याने पोलिसांनी माधव यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.

मयत प्रवीण हा आईला त्रास देत असल्याने त्याचा खून केल्याचे त्याने प्राथमिक चौकशीत पोलिसांना सांगितले. या प्रकरणी उपनिरीक्षक कसबेवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी माधव गाडेकर व त्याची आई सीताबाई गाडेकर यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी माधव यास ताब्यात घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news