हिंगोली : मसोड फाट्याजवळ आढळला शेतकऱ्याचा मृतदेह

हिंगोली : मसोड फाट्याजवळ आढळला शेतकऱ्याचा मृतदेह

कळमनुरी; पुढारी वृत्तसेवा : नांदेड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर मसोड फाट्याजवळ स्वतःच्याच शेतात शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला. नामदेव तुकाराम मिराशे (वय ४५, रा. शिवणी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची नोंद कळमनुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

नामदेव मिराशे हे रविवारी रात्री ८ वाजता आपल्या घरातून बाहेर पडले होते.  नेहमीप्रमाणे मसोड फाट्याजवळ असलेल्या शेताकडे फेरफटका मारण्यासाठी ते गेले होते. आज सकाळी मसोड फाटा रोडवर व्यायाम करणाऱ्या तरुणांना रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळला. त्यांनी कळमनुरी पोलीस स्टेशनला माहिती दिली. ही घटना समजताच पो. नि. मोहन भोसले, पो. उप.नि. गजानन कांगणे, माधव भडके, दादासाहेब कांबळे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news