हिंगोलीत नराधम पित्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार | पुढारी

हिंगोलीत नराधम पित्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली तालुक्यात नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणी पित्या विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.२८) गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी पित्याला अटक केली आहे.

पीडित मुलीच्या आईचा तिच्या लहानपणीच मृत्यू झाला आहे. तर तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यामुळे सध्या पीडित मुलगी आणि तिचे वडील दोघेच घरी राहत होते. १० महिन्यांपुर्वी रात्रीच्या वेळी त्या मुलीच्या वडिलाने तिच्यावर अत्याचार केला व तिला मारहाण केली. सदर प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरून गेली. वडीलाच्या भितीपोटी तिने घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यानंतर वडिलाने वारंवार तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

मंगळवारी रात्री पीडित मुलगी आणि वडील दोघे घरी झोपले होते. रात्री वडिलाने पुन्हा तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला असता तिला मारहाण केली. वडिलाच्या तावडीतून सुटून तिने गावातील प्रतिष्ठीत नागरीकाला घडलेला प्रकार सांगितला. मुलगी घाबरलेली पाहून त्या गावकऱ्याने तिला धिर दिला. त्यानंतर तिला हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आणले. या ठिकाणी मुलीने घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी तिच्या वडिलावर पोक्सो कायद्यांगर्तत गुन्हा दाखल केला आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड, उपनिरीक्षक संतोष मुपडे, जमादार विजय चव्हाण यांच्या पथकाने पीडितेच्या वडिलाला अटक केली.

हेही वाचा : 

Back to top button