उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम  153(A), 500, 505(3), 506(2), आणि 34 अन्वये गुन्‍हा नोंदवला असल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. (Maharashtra Politics)

Maharashtra Politics :  मुख्यमंत्री शिंदेंच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणि..

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के वापरल्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसी ४२०, ४६५,४६८,४७१ आणि ४७३ नुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.अधिकार्‍यांच्या बदल्यांपासून व्यक्तिगत मदतीसाठीच्या निवेदनांवर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांची सुमारे बारा निवेदने समोर आली आहेत.

हेही वाचा 

Back to top button