औंढा-हिंगोली रस्त्यावर टायर फुटल्याने ट्रक उलटला, एक जण गंभीर जखमी | पुढारी

औंढा-हिंगोली रस्त्यावर टायर फुटल्याने ट्रक उलटला, एक जण गंभीर जखमी

औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ ते हिंगोली रस्त्यावर हिवराजाटू पाटी जवळील पुलावर टायर फुटल्याने ट्रक उलटला. या अपघातात चालक बचावला. तर एकजण जखमी झाला. ही घटना आज (दि.६) पहाटे तीनच्या सुमारास घडली. चालक फकीरबा काकडे बचावला. तर मंगेश जाधव हा गंभीर जखमी झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरात राज्यातील मोहा येथून कांदे घेऊन वरंगल तेलंगणाकडे जाणाऱ्या ट्रकचा (एम एच 20 डीई 7092) टायर फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. या अपघातानंतर ट्रक पुलावरच उलटल्याने रस्ता बंद झाला होता. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेडकडे जाणारी वाहतूक सुमारे ५ तास खोळंबली होती.

या घटनेची माहिती मिळताच औंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीएस राहिरे, उपनिरीक्षक मिथुन सावंत यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमीस रुग्णालयात दाखल केले. तत्काळ महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शैलेश मुदीराज जमादार, के. झेड. खतीब, मोतीराम लोखंडे घटनास्थळी दाखल झाले. ट्रकमधील कांदे काढून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला.

हेही वाचा 

Back to top button