हिंगोली : औंढा-वसमत येथे रमेश चेन्नीथला, नाना पटोले यांचे स्वागत | पुढारी

हिंगोली : औंढा-वसमत येथे रमेश चेन्नीथला, नाना पटोले यांचे स्वागत

वसमत; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला व काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे एका कार्यक्रमानिमित्त नांदेडकडे जात होते. यावेळी औंढा- वसमत रस्त्यावरील जिंतूर टी पॉईंट जवळ ते आले असता त्यांचा आज (दि.२८) सकाळी आमदार डॉ. प्रज्ञा सातव व काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मुनीर पटेल, वैजनाथ आप्पा सराफ, प्रकाश थोरात, युवा नेते विलास गोरे, रमेश जाधव, अरुण देशमुख, नगरसेवक गटनेते अजु इमदार, सुरेश जावळे, शंकर काळे, पंजाब गडदे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button