हिंगोली : जनावरे चोरणार्‍या कळमनुरीतील तिघांना अटक; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

हिंगोली : जनावरे चोरणार्‍या कळमनुरीतील तिघांना अटक; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: कळमनुरी शिवारातून जनावरे चोरी करणार्‍या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज (दि.२१) अटक केली. त्यांच्याकडून एक पिकअप व्हॅन व रोख रक्कम असा ५.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात अन्य तिघांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अल्ताफ गफारखान पठाण, वसीम अक्रम शेख हबीब (रा. इंदिरानगर कळमनुरी), अजीमखान जरीब खान पठाण (रा. खाजा कॉलनी, कळमनुरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर म्हशी पूर्णा येथील इमरान कुरेशी, मकदुम कुरेशी यांना विक्री केल्याचे सांगितले. या म्हशी चोरण्यासाठी ऊरूज खान युसूफ खान (रा. कळमनुरी) याने रेकी केल्याचे त्यांनी सांगितले.

कळमनुरी शिवारातील नंदकुमार सोनटक्के यांच्या शेतातून दोन जाफराबादी व मुर्‍हा म्हशी चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेला आवश्यक सुचना देण्यात आल्या होत्या. त्यावरून पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार राजू ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने कळमनुरी परिसरात माहिती घेण्यास सुरवात केली.

दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या तिघांकडून म्हशी विक्री करून आलेले पैसे तसेच पिकअक व्हॅन असा ५.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात अन्य तिघांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान चोरीच्या म्हैशी खरेदी करणारे पूर्णा येथील प्रतिष्ठीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नगरसेवक पिता व पुत्र या दोघांनाही आरोपी करण्यात आल्याने शेतकर्‍यांचे पशुधन चोरणार्‍यांच्या मुळावरच घाव घालण्यात पोलीस यशस्वी ठरले आहेत. विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने तब्बल 40 ते 50 सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना बेड्या ठोकल्या.

हेही वाचा 

Back to top button