हिंगोली : आखाडा बाळापूर तालुका निर्मितीच्या मागणीसाठी उपोषण | पुढारी

हिंगोली : आखाडा बाळापूर तालुका निर्मितीच्या मागणीसाठी उपोषण

आखाडा बाळापुर; पुढारी वृत्तसेवा : आखाडा बाळापूर तालुका निर्मितीच्या मागणीसाठी आज (दि.१०) पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्यात येत आहे. यामध्ये गावकऱ्यांसह पत्रकारांनी सहभाग नोंदविला आहे. पुढील चार दिवस हे साखळी उपोषण चालणार असून त्यानंतर तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या आखाडा बाळापूर तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी १९८१ पासून केली जात आहे. यासाठी गावकऱ्यांसह पत्रकार व तालुका संघर्ष समितीने वेळोवेळी आंदोलन केले. मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. मागील काही दिवसांत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आखाडा बाळापूर तालुका निर्मिती करण्याची मागणी केली होती. त्यावेळी तालुका नाही तर किमान ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा तरी द्यावा, अशी आग्रही मागणी केली होती. मात्र त्यावेळीही आश्‍वासनेच मिळाली आहेत.

दरम्यान, आता तालुका निर्मितीच्या मागणीसाठी पत्रकार व सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत प्रशासनाकडे निवेदन सादर करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. तत्पुर्वी शहरातून रॅली काढण्यात आली. त्यानंतर उपनिरीक्षक बी. बी. चोपडे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर माजी सभापती संजय पाटील – बोंढारे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डी. के. दुर्गे, काँग्रेस नेते जकी कुरेशी, माजी उपसभापती गोपू पाटील सावंत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. आखाडा बाळापूर तालुका निर्मिॅतीसाठी आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी माजी उपसरपंच विजय पाटील बोंढारे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते डॉ संतोष बोंढारे ,सुशील बोंढारे,मधुकर चेटप विनायक हेंद्रे ,ठाकूरसिंग बावरी, विठ्ठल पंडित, बालूसिंग ठाकूर,दिलीप मिरटकर, शंकर मुलगीर ,माणिक पंडित, गंगाधर अडकिने , गोविंद देसाई, नागेश पांचाळ, आनंद बलखंडे दिलीप देशमुख, गजानन चव्हाण, संतोष आमले, संतोष कुंभकर्ण यशवंत नरवाडे, प्रकाश कोकडवार, चंद्रकांत धुळे ,अजमत फारुकी यांच्यासह नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button