शिवसेना, राष्ट्रवादीच्या याचिकांवर शुक्रवारी सुनावणी | पुढारी

शिवसेना, राष्ट्रवादीच्या याचिकांवर शुक्रवारी सुनावणी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना आदेश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी (१३ ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे. याच विषयाशी निगडित शिवसेनेचीही याचिका असल्याने दोन्ही प्रकरणांची एकत्रित सुनावणी घेण्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने आज आदेश दिले.

अजित पवार आणि अन्य सात आमदारांना पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरवण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना आदेश द्यावे यासाठीची याचिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च
न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने शुक्रवारी (१३ ऑक्टोबर) शिवसेनेच्या प्रकरणासोबतच एकत्रित सुनावणी करण्याचा निर्णय घेतला.

याचिकाकर्ते जयंत पाटील यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. अजित पवार गटाची बाजू ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी मांडली. अपात्रतेची याचिका सप्टेंबरमध्येच दाखल करण्यात आली आणि याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, असा युक्तिवाद रोहतगी यांचा होता; तर यासंदर्भातील शिवसेनेची याचिका जुलैमध्येच दाखल झाल्याचे सिब्बल यांचे म्हणणे होते. त्यावर सरन्यायाधीशांनी शिवसेनेच्या याचिकेसोबत या याचिकेची एकत्रितपणे सुनावणी करण्याचे आदेश दिले. दोन्ही प्रकरणे वेगवेगळी असल्याचे मुकुल रोहतगी यांचे म्हणणे होते…

Back to top button