हिंगोली : ६३ ठिकाणी पोलिसांचे छापे; ३ लाखांचे मद्य जप्त, ३८ चालकांवर गुन्हे

हिंगोली : ६३ ठिकाणी पोलिसांचे छापे; ३ लाखांचे मद्य जप्त, ३८ चालकांवर गुन्हे

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा: हिंगोली शहरासह जिल्हाभरात धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर मद्य विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी ६३ ठिकाणी छापे टाकून तब्बल ३ लाख रुपये किंमतीची मद्य जप्त केले. तर मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या ३८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

हिंगोली शहरासह जिल्हाभरात होळी व धुलीवंदनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हयातील सर्व १३ पोलिस ठाण्यांना सतर्क करण्यात आले होते. यामध्ये वाहनांची तपासणी करावी, बेकायदेशीर मद्य विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर छापे टाकावेत, मद्य पिऊन वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिले होते. तसेच संवेदनशील ठिकाणी गस्त ठेवण्याच्या सुचनाही दिल्या होत्या. त्यानुसार अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपाधीक्षक विवेकानंद वाखारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ पोलिस ठाण्यांतर्गत १३ पथके स्थापन करण्यात आली होती. याशिवाय गुन्हे शाखेचे पथकही तैनात केले होते.

या पथकाने दोन दिवसांत ६३ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये सुमारे ४०० लिटर मद्य जप्त करण्यात आले. यामध्ये देशी, विदेशी दारुसह, गावठी दारुचा समावेश आहे. या दारुची किंमत सुमारे ३ लाख रुपये आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. या शिवाय ३८ जण दारु पिऊन वाहने चालवित असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news