

जवळाबाजार; पुढारी वृत्तसेवा : येथील कृषि बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज (दि.३) अखेरच्या दिवशी एकूण १८४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सोसायटीत गटातून ११, ग्रामपंचायत गटातून ४, व्यापारी गटातून २, हमाली मापाडी गटातून १ अशा एकूण १८ जागांसाठी १८४ अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीत २२५४ मतदार मतदान करणार आहेत.
या निवडणुकीची प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू झाली. या बाजार समितीच्याअंतर्गत हट्टा व शिरडशहापुर येथील उपबाजार पेठ येते. ५ एप्रिलरोजी छाननी, ६ ते २० एप्रिलरोजी उमेदवारी अर्ज मागे घेणे, २१ एप्रिलला चिन्ह वाटप, तर २८ एप्रिलरोजी मतदान होणार आहे.
या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी देताना सर्वच पक्षांची डोकेदुखी होणार आहे. अर्ज माघारीनंतर आघाडी व युती कशी होणार हे चित्र स्पष्ट होईल. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी , ठाकरे गट, शिवसेनेतून मोठ्याप्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत.
हेही वाचा