हिंगोली : जवळाबाजार परिसरात ४१ अंश तापमानाची हॅट्रिक

file photo
file photo
Published on
Updated on

जवळाबाजार(हिंगोली), पुढारी वृत्‍तसेवा : जवळाबाजार येथे मागील दोन दिवसापासून तापमानात मोठ्याप्रमाणात वाढ होत असून सलग तिसरा दिवशी तापमान ४१अंश सेल्सियस झाले आहे. तापमानाने आज हॅट्रिक केली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात विवाह होत असून परिसरातील नागरीकांना उपस्थितीत राहून सदिच्छा भेट देण्यास येताना उन्हाच्या त्रासाला सामाेरे जावे लागत आहे.

मागील पंधरा दिवसांत तापमानात बदल होत ढगाळ वातावरणामूळे उन्हाची तीव्रता कमी होती. परंतु परिसरात मंगळवार पासून तापमानात मोठ्याप्रमाणात वाढ होत असून, मंगळवारी ३९ अंश, बुधवारी ४१अंश, गुरुवारी ४१ अंश व शुक्रवारी ४१अंश सेल्सियस तापमान वाढत असून सलग तीन दिवस ४१अंश सेल्सियस तापमान आकडा  पार करून हॅट्रिक केली आहे. तर आगामी  दोन दिवसात तापमानात मोठ्याप्रमाणात वाढ होणार असे सांगण्यात आले आहे. वाढत्या‍ उन्हामूळे दुपारनंतर बाजार पेठेत शुकशुकाट पहावयास मिळत आहे.

-हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news